सुष्मिता सेनची संपत्ती ऐकून व्हाल थक्क!

    15-Jul-2022
Total Views | 214
 
 
 

sen 
 
 
 
 
मुंबई : १९९४ साली मिस युनिव्हर्स ठरलेली बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेन पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे, ते तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे. कारण उद्योगपती ललित मोदी यांनी सुष्मिता सेन बरोबर आपले काही खाजगी फोटो शेअर करत दोघे एकमेकांना डेट करत असल्याचे सांगितले आहे.
 
 
 
 
 
आज एव्हढ्या वर्षांनी देखील सुष्मिता सेन हिने अनेक अभिनेत्रींना सौंदर्यात आणि फिटनेसच्या बाबतीत मागे टाकले आहे. ती एक यशस्वी अभिनेत्री म्हणून तर ओळखली जातेच परंतु, तिच्या रिलेशनशिप्स मुळे , खाजगी आयुष्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते.कधी रिलेशनमुळे तर कधी ब्रेकअपमुळे ती प्रसिद्धीझोतात असते. काही दिवसांपूर्वी रोह्मन शॉलसोबतच्या ब्रेकअपमुळे ती चर्चेत होती तर आता उद्योगपती ललित मोदींसोबतच्या रिलेशनशिपमुळे ती चर्चेत आली आहे. उद्योगपती ललित मोदींनी नुकतेच आपण सुष्मिता सेनसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे उघड करताच तिच्या बद्दल पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.
 
 
 
 
 
वयाच्या १८ व्या वर्षी मिस युनिव्हर्सचा किताब पटकावणारी सुष्मिता कोट्यावधींची मालकीण आहे. सुष्मिता सेनने चित्रपट आणि वेबसीरिजच्या माध्यमातून अफाट कमाई केली आहे. ती महिन्याला जवळजवळ ६० लाख कमावते. तर एका चित्रपटाचे ३ ते ४ कोटी इतकं मानधन ती घेते. एवढेच नाही तर जाहिरातींच्या माध्यमातून सुष्मिता सेन तब्बल १.५ कोटींपर्यंत कमाई करते. ४६ वर्षांच्या सुष्मिता सेनने चित्रपट, वेबसीरिज आणि जाहिरातींमधून गडगंज पैसे मिळवले आहेत. एका वेबसाईटने सांगितल्या नुसार अभिनेत्री सुष्मिता सेनची संपत्ती ही अंदाजे ७४ कोटींची आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121