मुंबई : बॉलीवूडमध्ये काही चित्रपट एका नंतर एक फ्लॉप होत आहेत. चित्रपट जरी बिग बजेट वा सुपरस्टार्सचे असले तरी त्याचा फारसा परिणाम बॉक्स ऑफिसवर झालेला दिसत नाही. नुकताच रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या आगामी 'ब्रह्मास्त्र भाग १ - शिवा' चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. बुधवारी १५ जून रोजी हा ट्रेलर धर्मा प्रोडक्शन ने प्रदर्शित करताच त्यावर लगेचच अनेक मिम्सचा पूर आला आहे.
दिग्दर्शक अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’ च्या ट्रेलरला अमिताभ बच्चन यांनी आवाज दिला आहे आणि या ट्रेलरच्या सुरुवातीलाच रणबीर कपूरची झलक आपल्या बघायला मिळत आहे. येथे सर्व शक्तिशाली अस्त्राच्या शोधाची कथा यामध्ये सांगितली आहे. चित्रपटात सर्व अस्त्रांची देवता 'ब्राह्मस्त्रा'च्या शक्तीची जाणीव करून द्यायचा प्रयत्न करून दिला आहे. अमिताभ बच्चन, आलिया भट्ट, रणबीर कपूर यांच्या बरोबरच साउथचे सुपरस्टार नागार्जुन, मौनी रॉय यांची झलक देखील या ट्रेलरमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे.
या ट्रेलर मध्ये ब्राह्मस्त्राला शस्त्रांची देवता म्हटले गेले आहे, रणबीर 'शिवा' ही भूमिका सकारात आहे परंतु त्याने एका प्रसंगात, मंदिरात पायात चप्पला घालून घंटा वाजवताना दिसत आहे; त्यामुळे हिंदू धर्माचा अपमान झाला आहे, असे ट्विटर वर प्रतिक्रिया येत आहेत .तसेच शक्तिमान पेक्षा हा चित्रपट चांगला नसेल, हे खात्रीने सांगू शकतो, असेही काही युजर्स म्हणत आहेत. एकाने ट्वीट केले आहे, मार्वेल, अलिफलैला, हातिमताई आणि वारक्राफ्ट या सर्वांचे VFX चोरी करून झाल्यानंतर ब्रह्मास्त्र तयार झाला आहे.