मुंबई : "भाजप विरोधकांना त्रास देण्याचा प्रयत्न सध्या सुरु आहे. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडीने पाठवलेली नोटीस बेकादेशीर आहे.", असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोमवारी (दि. १३ जून) पत्रकारांना संबोधताना केले. विरोधकांचे हे षडयंत्र असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले. यावर "नोटीस दिल्लीच्या गांधींना...कळा मुंबईच्या लाचारांना...", असे म्हणत भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी राऊतांवर चांगलाच पलटवार केला आहे.
"केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांचा सुरू असलेला छळ हा देशाच्या स्वातंत्र्याला आणि लोकशाहीला खड्ड्यात घालण्याचा प्रयत्न आहे. भाजपकडून सध्या विरोधकांना त्रास देण्याचे षडयंत्र रचले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणजे सोनिया गांधी आणि राहुल गांधींना ईडीने पाठवली ही नोटीस आहे.", असे संजय राऊत यांचे म्हणणे आहे.
राऊतांच्या वक्तव्यावर चित्रा वाघ याचा पलटवार
"भाजप विरोधकांना त्रास देण्याचा प्रयत्न सध्या सुरु आहे. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांना ईडीने पाठवलेली नोटीस बेकादेशीर आहे.", असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते. यावर भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी ट्विटच्या माध्यमातून राऊतांवर चांगलाच पलटवार केला. 'नोटीस दिल्लीच्या गांधींना गेली आहे मात्र त्याच्या कळा मुंबईच्या लाचारांना बसतायत', असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिल्याचे दिसून येत आहे.
काँग्रेस कार्यकर्ते दिल्ली पोलिसांच्या ताब्यात
"नॅशनल हेराल्ड प्रकरणी राहुल गांधी सोमवारी (दि. १३ जून) दिल्लीच्या ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजेरी लावणार आहेत. या दरम्यान काँग्रेसकडून ठिकठिकाणी निदर्शने करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ईडी कार्यालयाकडे जाणारे सर्व मार्ग दिल्ली पोलिसांनी सील केले आहेत. त्या ठिकाणी जमलेल्या काही काँग्रेस कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे उघड झाले आहे.