अजित सूर्यकांत वाडीकर दिग्दर्शित आणि अभिनेत्री 'मुक्ता बर्वे' मुख्य भूमिका असलेला 'वाय' हा चित्रपट येत्या २४ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'वाय' चित्रपटाचा पहिला लुक समोर आल्यापासूनच या चित्रपटासंदर्भात अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात उपस्थित झाले होते. सिनेमाच्या नावापासून ते देखील . सिनेमाच्या पोस्टरमध्ये मुक्ता बर्वेने हातात धरलेली मशाल, इथपर्यंत अनेकांना प्रश्न पडले. हातात धरलेली सुरी ते मशाल आणि मुक्ताचे विस्फारलेले डोळे दाखावणारे सिनेमाचे हे आगळेवेगळे पोस्टर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आले. या सिनेमाविषयी अनेक प्रश्न पडलेले असताना सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. टीझर पाहून अनेकांची उत्सुकता वाढली आहे पण चित्रपटातील गुढ अद्याप कायम आहे.
टीझर ३५ सेकंदाचा असला तरीही प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा आहे. या टीझरमध्ये झोपेतून अचानक जागी झालेली मुक्ता दिसते, आजूबाजूला काय चालू आहे याचा अंदाज बांधत असतानाच तोंडाला रक्त लागलेला कुत्रा तिच्या बिछान्यावर पाय देऊन तिच्या समोर येतो. 'वाय' या शिर्षकाची सर्वत्र चर्चा सुरू असताना या टीझरने कुतुहलात आणखी भर पडली आहे. याविषयी सांगताना दिग्दर्शक अजित सूर्यकांत वाडीकर म्हणाले, ''वाय' या शिर्षकामागे खूप मोठा अर्थ दडलेला आहे. वाय ही आपल्या सर्वांच्या अस्तित्वाची, अस्तित्वासाठीच्या संघर्षाची कहाणी आहे. ह्या टीझरचा आणि 'वाय' या नावाचा अर्थ तुम्हां सर्वांना जाणून घ्यायचा असेल तर 'वाय' नक्की म्हणजे नक्की पहा." मुक्ता आणि प्राजक्ता यांच्याशिवाय सिनेमात आणखी कोणते कलाकार दिसणार आहेत हे देखील अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.त्यामुळे सर्व प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना २४ जून रोजी सिनेमा पाहिल्यावर कळणार आहे.