"बाबासाहेब पुरंदरेंनी मला मदत केली नव्हती"

जेम्स लेनचे स्पष्टीकरण

    17-Apr-2022
Total Views | 225

james
 
मुंबई: "मी लिहिलेल्या पुस्तकासाठी बाबासाहेब पुरंदरेंनी मला कोणतीही मदत केली नव्हती" असे स्पष्टीकरण जेम्स लेन यांनी दिले आहे. बाबासाहेब पुरंदरेंनी लेखक जेम्स लेनला त्यांचे 'शिवाजी द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया' हे वादग्रस्त पुस्तक लिहिण्यासाठी मदत केली होती असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला होता. या आरोपानंतर जेम्स लेनची 'इंडिया टुडे' या वृत्तवाहिनीने ईमेलद्वारे मुलाखत घेतली होती त्यावेळी त्यांनी हे स्पष्टीकरण दिले होते.
 
 
 
मी फक्त कथा सांगतो, कुठलाही ऐतिहासिक दावा मी माझ्या पुस्तकातून करत नाही असं दावा जेम्स लेनने या मुलाखतीत स्पष्ट केले आहे. शरद पवार यांनी केलेल्या टीकेवर "बाबासाहेब पुरंदरे हे सॉफ्ट टार्गेट असून फक्त राजकीय स्वार्थासाठी त्यांच्यावर आरोप केले जात आहेत" असा आरोप राज ठाकरे यांनी त्यांच्या ठाण्याच्या सभेत केला होता.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
पुणे, चंद्रपूर, नंदुरबार, धाराशीव जिल्ह्यात उबाठा गटाला खिंडार

पुणे, चंद्रपूर, नंदुरबार, धाराशीव जिल्ह्यात उबाठा गटाला खिंडार

शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाने प्रभावित होत आज महाराष्ट्रातील पुणे, चंद्रपूर, नंदुरबार आणि धाराशीव जिल्ह्यातील उबाठा पक्षाच्या माजी नी आज शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे या चार जिल्ह्यांत उबाठा गटाला खिंडार पडले आहे. तसेच मध्य प्रदेशातील जबलपूर, विदीशा या जिल्ह्यांमधील उबाठा पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत धनुष्यबाण हाती घेतला. मुंबईत आयोजित पक्ष प्रवेश सोहळ्याला मंत्री उदय सामंत, विधान परिषद उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, माजी आमदार ज्ञानराज चौगुले..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121