‘एन्थुजिया’चा उत्साहात प्रारंभ

    16-Mar-2022
Total Views | 115

Vjti 1
 
 
मुंबई (सौरभ मुळीक) : शहरातील माटुंगा पूर्व येथील ‘वीर माता जिजाबाई टेक्नोलॉजिकल इन्स्टिट्यूट’चा (व्हीजेटीआय) २०२२चा वार्षिक उत्सव ‘एन्थुजिया’चा मंगळवार, दि. १५ मार्च रोजी उत्साहात प्रारंभ झाला. कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे हा उत्सव ‘ऑनलाईन’ साजरा करण्यात येत होता. यंदा मात्र, हा उत्सव प्रत्यक्ष स्वरूपात पार पडत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण होते.
 
 
 
Vjti 2
 
 
रविवार, दि. २० मार्चपर्यंत हा उत्सव साजरा केला जाणार असून यामध्ये १४हून अधिक विविध क्रीडास्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी सायंकाळी ५ वाजता या खेळांमध्ये सहभागी असणार्या विविध अभियांत्रिकी शाखेच्या ११ संघांनी खिलाडूवृत्तीचे दर्शन घडवत ‘प्रत्येक खेळ खेळू’ अशी सामायिक शपथ घेतली. तसेच अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांनी मशाल पेटवत यंदाच्या ‘एन्थुजिया’ची अधिकृतरित्या सुरुवात झाल्याची घोषणा केली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ‘सीआयडी’ फेम अभिनेते दयानंद शेट्टी हे येणार होते. परंतु, काही कारणास्तव उपस्थितन राहता आल्यामुळे त्यांनी ‘ऑनलाईन’ माध्यमाद्वारे आपल्या शुभेच्छा विद्यार्थ्यांना कळविल्या.
 
 
vjti 5
 
यावेळी महाविद्यालयाचे संचालक धीरेन पटेल यांनी खेळाडूवृत्ती काय असते आणि त्याचे पालन का करणे गरजेचे आहे, याबाबत मार्गदर्शन केले. मंगळवारी पहिल्या दिवशी दोन संघामध्ये फुटबॉलचा एक सामनाही खेळविण्यात आला. खर्या स्पर्धा या बुधवार, दि. १६ मार्चपासून सुरू होणार आहेत. या उत्सवाची सांगता रविवार, दि. २० मार्च रोजी मॅरेथॉनने होणार आहे. दै. ‘मुंबई तरुण भारत’ आणि ‘महाएमटीबी’ याचे माध्यम प्रायोजक आहेत.
 
 
vjti 4
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121