मुंबई : शिवसेनेचा नेता रघुनाथ कुचिक याने ज्या मुलीवर अत्याचार केले, ती मुलगी गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होती. गोव्यातील कोल्वा गावातून त्या मुलीशी संपर्क झाला असल्याचे आता उघड झाले आहे. भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांना पिडीत मुलीचा फोन आल्याचे त्यांनी बुधवारी सांगितले. गंभीर बाब म्हणजे यादरम्यान पिडीत मुलीला काही लोकांकडून इंजेक्शन दिले असून कागदपत्रांवर सह्यादेखील घेण्यात आल्याचे चित्रा वाघ यांनी सांगितले.
"पिडीत मुलीला काही लोकांकडून इंजेक्शन देण्यात आले. त्यानंतर काही कागदपात्रांवर सह्याही घेण्यात आल्या. यात व्यक्तींमध्ये काही पोलिसांचासुद्धा समावेश आहे. या प्रकरणाची सविस्तर माहिती पुणे पोलिसांना दिल्यावर ते आता गोवा पोलीस स्थानकात पोहचत आहेत. तसेच पिडीत मुलीचे पालकही त्या ठिकाणी पोहोचत आहेत. त्यामुळे मुलीला पालकांच्या ताब्यात देण्यात येईल अशी खात्री आहे.", असा खुलासा चित्रा वाघ यांनी ट्विटरवर एका व्हिडीओमार्फत केला आहे.