पुणे विद्यापीठाच्या प्रा. संतश्री धुलीपुडी पंडित बनल्या जेएनयूच्या कुलगुरू

प्रा. संतश्री धुलीपुडी पंडित ठरल्या जेएनयुच्या पहिल्या महिला कुलगुरू

    07-Feb-2022
Total Views | 234

JNU
नवी दिल्ली : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्राध्यापिका संतश्री धुलीपुडी पंडित यांची जवाहरलाल नेहरू विद्यापीठा (जेएनयु)त कुलगुरू म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, त्या जेएनयुच्या पहिल्या महिला कुलगुरू ठरल्या आहेत. त्यांचा ५ वर्षांचा कार्यकाल असेल. तसेच, माजी कुलगुरू एम जगदीश यांची विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
 
 
१५ जुलै १९६२मध्ये रशियाच्या सेंट पीटर्सबर्गमध्ये जन्मलेल्या संतश्री धुलीपुडी पंडित या १९८८पासून अध्यापन क्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच, १९८५पासून संशोधन क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी चेन्नईतील प्रेसिडेन्सी कॉलेजमधून इतिहास आणि सामाजिक मानसशास्त्र या विषयात पदवी प्राप्त केली. तसेच, १९९०मध्ये जेएनयूमधून आंतरराष्ट्रीय संबंधित पीएचडी मिळवली. त्यांनी १९९५मध्ये स्वीडनच्या उप्पसाला विद्यापीठातून 'शांतता आणि संघर्ष' अभ्यासात पोस्ट-डॉक्टरल डिप्लोमा देखील मिळवला आहे.
 
 
हैदराबादमधील अमेरिकन स्टडीज रिसर्च इन्स्टिट्यूट तसेच इंडियन असोसिएशन ऑफ अमेरिकन स्टडीज, ऑल इंडिया पॉलिटिकल सायन्स असोसिएशन, भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट, इंडियन सेक्युलर सोसायटी इ. अशा अनेक प्रतिष्ठित संस्थांच्या सदस्या राहिल्या आहेत. तसेच, त्यांनी १९९०मध्ये 'भारतातील संसद आणि परराष्ट्र धोरण' आणि २००३मध्ये 'आशिया-नीती आणि धोरणातील पुनर्रचना पर्यावरणीय प्रशासन' अशी काही पुस्तकांचे लिखाणदेखील केले आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121