'ब्लॉकचेन'द्वारे होणारं भारतातलं पहिलं लग्न!

पुण्यातल्या दांपत्याचा अनोखा विवाहसोहळा

    06-Feb-2022
Total Views | 213

Blockchain Marriage
 
 
 
पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदाच्या अर्थसंकल्प सादरीकरणात ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा उल्लेख केला होता. पुण्यातल्या एका जोडप्याने याच ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने डिजिटल लग्न केल्याचे समोर आले आहे. नोव्हेंबर २०२१ मध्ये त्यांनी याप्रकारे लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. असे लग्न करणारे हे देशातले पहिलेच दांपत्य ठरले आहे. विशेष म्हणजे या लग्नाला भटजी सुध्दा ऑनलाईनच होते.
 
 
 
पुणे शहरातल्या अनिल नरसीपुरम आणि श्रुती नायर यांनी हा डिजिटल स्वरूपात लग्न करण्याचा हटके पर्याय निवडून ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीद्वारे लग्न केले आहे. "लग्नाला ब्लॉकचेन ऑफिशियल केलं असून यात इथेरियम स्मार्ट कॉन्ट्रॅक्टसुध्दा केलं आहे. तसेच ओपन-सी वर एनएफटी (नॉन-फंजिबल टोकन) स्वरूपात एकमेकांविषयी वचनबद्धताही दाखवली आहे.", असे अनिल यांनी एका समाजमाध्यमावर पोस्ट करत सांगितले आहे.
 
 
असे झाले डिजिटल लग्न...
लग्नाला उपस्थित असलेल्या डिजिटल भटजींनी ओपन-सी वर एनएफटी करून तो अनिलला पाठवला होता. अनिल आणि श्रुती नायर हे दोघंही आपापल्या लॅपटॉपसोबत एकत्रित उपस्थित होते. या लग्नाला गूगल मीटद्वारे काहींनी उपस्थिती दर्शवली होती. अवघ्या पंधरा मिनटांच्या सोहळ्यात ट्रांजॅक्शन पूर्ण केलं. भटजींकडून ट्रांजॅक्शनला कन्फर्म केल्यावर एनएफटीला श्रुतीच्या डिजिटल वॉलेटमध्ये ट्रान्सफर करण्यात आले. ट्रांजॅक्शन पूर्ण झाल्यानंतर अनिल आणि श्रुती या दोघांनाही पती-पत्नी म्हणून मान्यता मिळाली. "ब्लॉकचेन टेक्नॉलजीद्वारे लग्न करणारे आम्ही पहिले आहोत; पण शेवटचे नक्कीच नाही. ब्लॉकचेन आपल्या ट्रांजॅक्शनच्या पद्धतीमध्ये मोठा बदल घेऊन आले आहेत. आम्हाला विश्वास आहे की, यावर आपण नक्कीच विश्वास ठेवू शकतो.", असे शेवटी समाजमाध्यमांवर पोस्ट करत अनिल नरसीपुरम यांनी या अनोख्या लग्नाची माहिती दिली.
 
 
अशी आहे ब्लॉकचेन टेक्नोलॉजी...
ब्लॉकचेन टेक्नोलॉजी हे एक डिजिटल प्लेटफॉर्म आहे. याठिकाणी फक्त डिजिटल करन्सीच नव्हे तर कोणतीही गोष्ट डिजिटल बनवून त्याचा रेकॉर्ड ठेवला जाऊ शकतो. ही एक सुरक्षित आणि डिसेंट्रलाईज्ड टेक्नोलॉजी आहे. हे हॅक करणे कठीण असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
‘ऑपरेशन सिंदूर’ : सामरिक स्वावलंबनाचा नवा मानदंड

‘ऑपरेशन सिंदूर’ : सामरिक स्वावलंबनाचा नवा मानदंड

विसाव्या शतकातील जागतिक संघर्षांच्या अनुभवातून शिकत, भारताने एकविसाव्या शतकात आपल्या संरक्षण धोरणात निर्णायक बदल केले. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे या परिवर्तनाचे अत्यंत प्रभावी उदाहरण. ही मोहीम केवळ सैनिकी विजयावर सीमित राहिली नाही, तर भारताच्या स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाच्या वाढत्या क्षमतेचे प्रतीक बनली. तसेच या मोहिमेने जगाला एक स्पष्ट संदेश दिला की, भारत आता कोणत्याही शत्रूला त्याच्याच भाषेत उत्तर देण्यास पूर्णपणे सक्षम आहे. या यशाने भारताच्या परराष्ट्र धोरणात एक नवा मानदंड स्थापित केला आणि जागतिक मंचावर आपल्या ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121