मुंबई : शनिवार, दि. १९ फेब्रुवारी रोजी चांदिवली आणि गोरेगाव याठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नवीन शाखांचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. चांदिवलीमधल्या शाखेचे उद्घाटन झाल्यानंतर राज ठाकरे हे गोरेगाव येथे दाखल झाले. मात्र गोरेगावच्या कार्यक्रमात उभारण्यात आलेले व्यासपीठ हे अचानक कोसळल्याचे यावेळी दिसून आले. व्यासपीठ कोसळले तेव्हा व्यासपीठावर राज ठाकरे आणि मनसेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. सर्वजण सुरक्षित असून कोणालाही दुखापत न झाल्याचे सांगण्यात येत आहे.