कुठे आहेत पर्यावरणमंत्री? 'आरे रेss' पुन्हा वृक्षतोड सुरूच
16-Feb-2022
Total Views | 133

मुंबई : सोमवारी 'व्हॅलेनटाईन'डे च्या निमित्ताने अनेकांनी सोशल मिडीया द्वारे 'आरे वाचवा' म्हणत पर्यावरण वाचावण्याची भुमिका मांडली. मात्र, दुसऱ्याच दिवशी आरेतील झाडांवर पुन्हा कुऱ्हाड पडत असल्याचे चित्र समोर आले आहे. आरे येथील युनिट १९ मध्ये मंगळवारी सकाळी पोलिसांच्या उपस्थितीत वृक्षतोड करण्यात आली. २०२१ मध्ये याच ठिकाणी वृक्षतोड करण्यात आली होती.
मंगळवारी युनिट १९ मध्ये आंब्यासारख्या मोठमोठ्या झाडांच्या फांद्या तोडायला कर्मचाऱ्यांनी सुरुवात केली. त्यानंतर स्थानिक नागरीक विरोध करण्यास पुढे आले तेव्हा नागरीकांना पोलिसांच्या खाकीचा धाक दाखवण्यात आला. अशी तक्रार नागरीकांकडून केली जात आहे. या वृक्षतोडीसाठी परवानगी कधी आणि कोणामार्फत देण्यात आली? असा सवाल नागरीकांनी विचारला असता याबद्दल कोणताही माहिती देण्यास नकार देण्यात आला.
दरम्यान, आरे मध्ये अदानी यांच्या कंपनीत केबल टाकण्यासाठी दी वृक्षतोट करत असल्याचाही आरोप केला जात आहे. मात्र, सदर प्रकाराशी अदानी आणि कंपनीचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्चीकरण देण्यात आले. सोबतचं यासंदर्भआत एमएमआरडीए किंवा एमएमआरसीएल कडे विचारणा करण्याचा सल्ला नागरीकांना देण्यात आला. त्यामुळे आता एकीकडे आरे वाजवा बोलणारे सरकार आरेतील वऋक्षतोड कधी थांबवणार असा सवाल प्रयावरण प्रेमी विचारत आहेत.