नवी दिल्ली : देशातील दुसऱ्या व तिसऱ्या दर्जाच्या शहरांसाठी आता एक तज्ज्ञांची समिती स्थापन केली जाईल. या समितीकडे या शहरांच्या विकासाठी सूचना करण्याचे काम राहील. या समितीच्या सूचनांना अनुसरून शहरांमध्ये रोजगारवाढ, गृहनिर्माण यांसाठी आराखडा तयार करण्यात येईल. या समितीकडे या शहरांच्या विकासाठी सूचना करण्याचे काम राहील. या समितीच्या सूचनांना अनुसरून शहरांमध्ये रोजगारवाढ, गृहनिर्माण यांसाठी आराखडा तयार करण्यात येईल.
शहर नियोजनासाठी आता नवीन संस्थांची निर्मिती
शहर नियोजनासाठी देशांतील विविध भागात ५ नव्या विद्यापीठांची स्थापना करण्यात येईल. सध्याच्या विद्यापीठांमध्ये सुद्धा शहर नियोजन या विषयाचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात येणार आहे. देशातील शहरांमध्ये वाढ होताना तेथे योजनाबद्ध विकासाला प्राधान्य देण्यात येणार आहे.