विवेकानंदांच्या विचारांचा प्रचार करणार्‍या मंगलाताई

    13-Nov-2022   
Total Views | 85
mangala


गेल्या 34 वर्षांपासून स्वामी विवेकानंदांचे विचार आणि योगाचा प्रसार डोंबिवलीतील मंगला ओक करीत आहेत. त्यांचे कार्य आणि जीवनप्रवासाविषयी जाणून घेऊया...


डोंबिवलीतील विवेकानंद केंद्राच्या पूर्णवेळ कार्यकर्त्या असलेल्या मंगला ओक यांचा जन्म दि. 12 नोव्हेंबर, 1942 रोजी झाला. त्या मूळच्या अक्कलकोटच्या. लग्नापूर्वी त्यांचे फक्त ‘एसएससी’पर्यंतचे शिक्षण झाले होते. पण अर्धवट राहिलेले शिक्षण त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. त्यामुळे लग्नाच्या 14-15 वर्षांनंतरही त्यांनी अपूर्ण राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याचा निर्धार केला. 1977 साली पुणे विद्यापीठातून संपूर्ण मराठी विषय घेऊन त्यांनी पदवी संपादन केली. पुढे पुणे विद्यापीठातूनच संपूर्ण मराठी विषय घेऊन त्यांनी एमएपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. 1981 मध्ये मुंबई विद्यापीठातून त्यांनी बी.एड्चे शिक्षण घेतले. 2002 साली त्यांनी योगशास्त्रात पदवी संपादन केली. याशिवाय हिंदी प्रावीण्य प्रथम वर्ग मिळवित त्या उत्तीर्ण झाल्या. भारतीय संस्कृती परीक्षा, भारतीय संस्कृतपीठम् प्रथम वर्गाने उत्तीर्ण झाल्या. त्यानंतर ‘विवेकानंद योग अनुसंधान संस्थान, बंगळुरू’ येथून योगशिक्षक व योगोपचार अभ्यासक्रम तसेच नागरी संरक्षण दलाचे प्रशिक्षण त्यांनी पूर्ण केले आहे.


विशेष म्हणजे, आताच दि. 12 नोव्हेंबरला वयाची 80 वर्षे पार केलेल्या मंगलाताईंनी नुकताच ‘भीष्म स्कूल ऑफ इंडिक स्टडिज, पुणे’चा ‘स्टडी ऑफ उपनिषद’ हा तीन महिन्यांचा अभ्यासक्रम 76 टक्के गुण प्राप्त करुन यशस्वीरित्या पूर्ण केला. त्यांनी ‘एसएनडीटी महाविद्यालया’त सहा वर्षे अध्यापनाचेही काम केले आहे.जानेवारी 1989 पासून त्या विवेकानंद केंद्रासाठी काम करू लागल्या. गेल्या 34 वर्षांत त्यांनी केंद्राचे स्थानिक, विभागीय (कोकण विभाग), प्रांतिक, अखिल भारतीय स्तरावर दायित्व पार पाडले आहे. 2002 पासून विवेकानंद केंद्राच्या पूर्णकालीन कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम पाहिले. विवेकानंद केंद्राच्या ‘अखिल भारतीय योग कोअर कमिटी’च्या त्या सदस्यादेखील आहेत. विवेकानंद केंद्राच्या महाराष्ट्र प्रांताची 20 ते 22 वर्षे योग वर्गप्रमुख व योग प्रतिमान प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.


1992 च्या विवेकानंद भारत परिक्रमेपासून ‘विश्वबंधुत्व दिना’चे औचित्य साधत 25 वर्षे विवेकानंद व्याख्यानमालेचे आयोजन विविध विषयांवर मान्यवर वक्त्यांच्या व्याख्यानांनी मंगलाताईंनी केले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने ‘स्वामी विवेकानंद-योगी अरविंद’, ‘महाराष्ट्राची संत परंपरा’, ‘योग एक जीवनपद्धती’ इत्यादी विविध विषयांवर वि. रा. करंदीकर, मुझफ्फर हुसेन, डॉ. जगदीश उपासनी, डॉ. शुभदा जोशी, रमेश पतंगे, चारूदत्त आफळे, डॉ. सच्चिदानंद शेवडे इत्यादी मान्यवरांची व्याख्याने झाली आहेत. 2016 मध्ये विश्व बंधुत्व दिनानिमित्त युवा संसदेचे आयोजन केले होते. त्यामध्ये डोंबिवलीतील युवक संघटनांचा सहभाग होता. विविध क्षेत्रातील 130 युवक आणि युवतींनी ऑनलाईन नोंदणी करून सहभाग दर्शविला होता. मंगलाताईंचे स्वामी विवेकानंद केंद्र आणि योग या विषयावर अनेक लेख प्रसिद्ध करण्यात आले आहेत. तसेच स्वामी विवेकानंद, श्री रामकृष्ण परमहंस, माँ शारदा यांच्यावर आघाडीच्या वृत्तपत्रातही त्यांचे लेख प्रसिद्ध झाले आहेत.


शाळा, महाविद्यालये आणि सामाजिक संस्थांमध्ये अनेकविध विषयांवर त्यांनी व्याख्याने दिली आहेत. ’वंदे मातरम्’ या विषयावर त्यांनी अनेक ठिकाणी व्याख्याने दिली आहेत. सुसंवाद, सकारात्मक विचारधारा, एकाग्रता व स्मृतिवर्धन आणि ‘माझ्या जीवनाचा मीच शिल्पकार’ इत्यादी विषयांवर कार्यशाळेचे आयोजन त्यांनी केले होते. योगासने, प्राणायाम, ओंकार ध्यान प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करून त्या माध्यमांतून हजारो प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण विवेकानंद केंद्राच्या माध्यमातून त्यांनी दिले आहे. इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘परीक्षा द्या हसत हसत’ या योग प्रतिमानाचे प्रशिक्षण वर्ग मंगलाताईंनी घेतले. विद्यार्थ्यांप्रमाणेच शिक्षकांसाठीही ‘समर्थ शिक्षक-समर्थ भारत’ या योग प्रतिमानाचे प्रशिक्षण वर्ग त्यांनी घेतले. विवेकानंद केंद्र पिंपळद, नाशिक येथे दर मे महिन्यातील प्रशिक्षण वर्गाच्या प्रमुख म्हणून दायित्व त्यांनी 12 वर्षे सांभाळले आहे. विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी येथे होणार्‍या योग प्रमाणपत्र अभ्यासाचे आयोजन व प्रशिक्षणाची जबाबदारी आणि आध्यात्मिक शिबीर प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.



समाजाच्या ज्या स्तरांसाठी आपण काम करतो, त्याप्रति आदरभाव आणि आपलेपणा असणे फार महत्त्वाचे असते. त्याचबरोबर सचोटी, चिकाटी, सहनशीलता, संघटन कौशल्य, रचनात्मक नियोजन क्षमता अशा गुणांचा परिपोषही अंगी असावा लागतो. तेव्हाच ते सामाजिक काम प्रभावी आणि चिरंतन स्मरणात राहते. लहानपणी आई-वडिलांचे संस्कार, राष्ट्र सेवा दलाचे संस्कार, अक्कलकोट-गाणगापूर-पंढरपूर या त्रिस्थळांचे बालपण आणि तिथे लाभलेले आध्यात्मिक संस्कार, ही संस्कार शिदोरी माझ्याकडे होती आणि तीच शिदोरी मला विवेकानंद केंद्राचे काम करताना उपयोगी पडली. हे काम पूर्णपणे समाधान देऊन गेले. फळाची अपेक्षा न करता काम करत राहणं, हे उत्तम सामाजिक कार्यकर्त्याचे लक्षण आहे. समाजासाठी काम करणार्‍या व्यक्तीने हे कायम लक्षात ठेवावे, असे मंगलाताई ओक सांगतात.




मंगला ओक यांना आरोग्यसेवा समितीचा योगकार्यासाठी पुरस्कार, श्री भीमेश्वर सद्गुरू नित्यानंद संस्था गणेशपुरी यांचा समाजसेवेबद्दलचा पुरस्कार, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली इंडस्ट्रीयल एरियाचा ‘अवॉर्ड ऑफ एक्सलन्स सर्व्हिस टू सोसायटी’ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा ‘आदर्श महिला पुरस्कार’ यासारख्या अनेक पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे. 80व्या वर्षीही विवेकानंदाच्या विचारांसह योगाच्या प्रचारांसाठी कार्य करणार्‍या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाला त्यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरूण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा.




अग्रलेख
जरुर वाचा
दर्जेदार ग्राहकसेवा, सुरळीत वीजपुरवठ्याला प्राधान्य द्यावे ; महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांचे निर्देश

दर्जेदार ग्राहकसेवा, सुरळीत वीजपुरवठ्याला प्राधान्य द्यावे ; महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांचे निर्देश

वीज वितरण यंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणाची कामे वेगाने सुरू आहेत. त्यामुळे नवीन वीजजोडणीसह सर्व ग्राहकांना सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठा देण्यास प्राधान्य द्यावे. सेवेच्या कृती मानकांनुसार निश्चित केलेल्या कालावधीतच सेवा द्यावी. तसेच वीजहानी कमी करून वीजबिलांच्या वसुलीला आणखी वेग द्यावा असे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी मंगळवारी (दि. २९) कोकण प्रादेशिक विभागाच्या आढावा बैठकीत दिले...

राज्य सहकारी संघ निवडणूकीत ‘सहकार पॅनेल’चे निर्विवाद वर्चस्व दरेकर-कुसाळकर-नलावडेंच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनेलचे २१ पैकी २० उमेदवार विजयी

राज्य सहकारी संघ निवडणूकीत ‘सहकार पॅनेल’चे निर्विवाद वर्चस्व दरेकर-कुसाळकर-नलावडेंच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनेलचे २१ पैकी २० उमेदवार विजयी

१०६ वर्षांची परंपरा लाभलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या २०२५-२०३० पंचवार्षिक निवडणुकीत आमदार प्रवीण दरेकर, राज्य सहकारी संघाचे नेते संजीव कुसाळकर आणि सहकारातील ज्येष्ठ नेते शिवाजीराव नलावडे यांच्या नेतृत्वाखालील ‘सहकार पॅनेल’ने २१ पैकी २० जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवित मोठा विजय संपादित केला आहे. महाराष्ट्रातील सहकार चळवळ पुन्हा ताकदीने कशी पुढे येईल यासाठी दिशादर्शक मार्गदर्शन करणारा संघ ठरेल, असा विश्वास यावेळी भाजपा गटनेते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकर यांनी व्यक्त केला...

*भारतीय शौर्य पुन्हा एकदा उजेडात आणुया, चला

*भारतीय शौर्य पुन्हा एकदा उजेडात आणुया, चला 'विजय दिवस साजरा करूया!*

आपल्या दैदीप्यमान पराक्रमी इतिहासाच्या जोरावर प्रखर राष्ट्रभक्तीने जगभरात भारतीय संस्कृतीची अटल छाप सोडणाऱ्या माझ्या भारतीय बांधवांना 'विजय दिवसाच्या' हार्दिक ' शुभेच्छा! २६ जुलै १९९९ या दिवशी तत्कालीन पंतप्रधान श्रद्धेय दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात कारगिल मध्ये पाकिस्तानला युद्धात पराजित करून 'भारतीय शुर सैनिकांनी ऑपरेशन विजय' यशस्वी केले. तब्बल १८ हजार फूट उंचीवर भारतीय सैन्याने आपले शौर्य जगाला दाखवले होते. एवढ्या उंचीवर आणि उणे ४० अंश सेल्सिअस तापमानात लढले गेलेले हे युद्ध जगातील एकमेव ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121