पटना ( Hijab controversy ): इराणसारख्या कट्टरपंथी देशातील महिला बुरखा किंवा हिजाब विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करत असताना दुसरीकडे भारतात हिजाबची मागणी करून गोंधळ घातला जातो. बिहारमधील मुझफ्फरपूर येथील एमडीडीएम महाविद्यालयात परीक्षेदरम्यान कॉपी केली जाऊ नये म्हणून हिजाब परिधान केलेल्या विद्यार्थिनींना शिक्षकाने कान दाखवण्यास सांगितले असता एका विद्यार्थिनींने तमाशा केला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुझफ्फरपूरच्या महंत दर्शन दास महिला कॉलेजमध्ये सेंट अप परीक्षा सुरू होती. त्यावेळी काही विद्यार्थिनी हिजाब घालून बसल्या होत्या. एका शिक्षकाला विद्यार्थिनींनी कानात ब्लूटूथ असल्याचा संशय आला. त्यामुळे त्यांनी विद्यार्थिनींना कान दाखवण्यास सांगितले. त्यावर मुली संतप्त झाल्या आणि त्यांनी कॉलेजमध्येच आरडा ओरडा करायला सुरुवात केली.
सदर विद्यार्थिनींनी आम्हाला तपासाच्या नावाखाली हिजाब काढण्यास सांगण्यात आल्याचा आरोप केला. कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी पोलिसांना तसेच त्याच्या पालकांना कॉलेजमध्ये बोलावले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पालक आणि विद्यार्थिनींना समजावून हे प्रकरण शांत केले.
याप्रकरणी विद्यार्थिनींचे हे कृत्य म्हणजे कॉलेजमधील वातावरण बिघडवण्याचा ( Hijab controversy ) डाव असल्याची प्रतिक्रिया महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. कनुप्रिया यांनी दिली. या महाविद्यालयाचा इतिहास खूप जुना आहे. या मुली इंटरमिजिएटच्या आहेत. सर्व परीक्षर्थींना मोबाईल आणि ब्लूटूथ काढण्यास सांगण्यात आले. पण या विद्यार्थ्यांनी उगीच अकांड तांडव करून ओढून ताणून त्याला धर्माशी जोडले.
ही अत्यंत लाजिरवाणी बाब असल्याचेही प्राचार्या डॉ. कनुप्रिया यांनी म्हटले आहे. या विद्यार्थिनींची उपस्थितीही ७५% पेक्षा कमी आहे. आता शिक्षणमंत्री आणि विद्यापीठानेही कमी उपस्थिती असलेल्या विद्यार्थिनींना अंतिम परीक्षेला बसू देऊ नये, असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे हे लोक उगीच ( Hijab controversy ) दबाव निर्माण करत आहेत. जेणेकरून कॉलेज प्रशासन त्यांच्यापुढे झुकेल. हिजाब हे फक्त निमित्त आहे, असे वक्तव्य प्राचार्य कनुप्रिया यांनी केले.