भाजपचा आणखी एक मास्टरस्ट्रोक! आदित्य ठाकरेंच्या मतदार संघात दणक्यात दिवाळी!

जांबोरी मैदानावर दीपोत्सवाचे दिमाखदार आयोजन

    14-Oct-2022
Total Views |
 

Dipotsav MUMBAI BJP
 
 
मुंबई : काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने 'मुंबई भाजप'ने जोरदार कंबर कसली आहे. संपूर्ण मुंबईत गणेशोत्सव, दहीहंडी आणि नवरात्रोत्सवाच्या नंतर आता दीपावली कार्यक्रमांचे आयोजन करून भाजपने पुन्हा एकदा ठाकरे गटाला मात दिली आहे. आदित्य ठाकरे आमदार असलेल्या वरळी मतदारसंघात भाजपकडून दीपावलीच्या औचित्यावर 'आपला मराठमोळा दीपोत्सव' या कार्यक्रमाचे दिमाखदार आयोजन करण्यात आले आहे. वरळीच्या जांबोरी मैदानावर १९ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर असे सलग ४ दिवस हा कार्यक्रम होणार असून पुन्हा एकदा ठाकरे गट विरुद्ध भाजपमध्ये शह काटशहची स्पर्धा रंगणार आहे.
 
 
मुंबई भाजपच्या वतीने या संदर्भात शुक्रवारी एक ट्विट करण्यात आले आहे. त्या ट्विटमध्ये मुंबई भाजपने म्हटले आहे की, 'यंदाची दिवाळी मुंबईकरांनी मराठमोळ्या जोशात,ढंगात साजरी करायची आहे. आपली खाद्य संस्कृती,आपली वेशभूषा, आपल्या शास्त्रीय संगीताच्या मैफिलीचा सहकुटंब आनंद लुटायचा आहे, आपण सर्व मुंबईकर आमंत्रित आहात दि. १९ ॲाक्टोबर ते २३ ॲाक्टोबर स्थळ- जांबोरी मैदान,वरळी. #आपला_मराठमोळा_दिपोत्सव.' अशा आशयाचे ट्विट मुंबई भाजपकडून करण्यात आले असून दीपावलीतही आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात भाजप धूम उडवून देणार हे नक्की.
 
 
आदित्य ठाकरे स्थानिक आमदार असलेल्या वरळी मतदारसंघात भाजपने काही महिन्यांपासून ठाकरेंना नामोहरम करण्याची एकही संधी सोडलेली नाही. २ महिन्यांपूर्वी याच जांबोरी मैदानावर दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करून भाजपने सार्वजनिक स्वरूपात ठाकरेंना पहिल्यांदाच चितपट केलं होतं. त्यानंतर नवरात्रोत्सवात ठिकठिकाणी भाजपकडून जंगी कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले होते.
 
 
वरळी हा ठाकरे गटाचा बालेकिल्ला समजला जातो, कारण वरळी या एका मतदारसंघात ठाकरे गटाकडून ३ आमदार देण्यात आलेले आहेत. ठाकरे परिवाराचे सदस्य पक्षप्रमुखांचे पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ म्हणून ठाकरे गटाने इथे जोर लावला आहे. मात्र, इतिहास पाहता दरवेळी भाजपनेच वरळीत बाजी मारलेली आहे. त्यामुळे यंदाच्या दीपोत्सवात ठाकरे गट काही करून दाखवणार की नेहमीप्रमाणे भाजप त्यांना धोबीपछाड देणार हे पाहून औत्सुक्याचे असणार आहे.
 
 
 
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121