आता "गुगल हँगआऊट"ची जागा आता ‘गुगल चॅट’ने घेतली आहे. त्यामुळे सध्या ॲपद्वारे गुगल हे ‘गुगल हँगआऊट’च्या सर्व आवृत्त्या बंद करण्यात आल्याबाबत यूजर्सना माहिती देत आहे. तसेच यातील डाटा देखील डाउनलोड करण्यास युजर्सना सांगितले जात आहे. परंतु हा डाटा डाउनलोड करण्यासाठी १ जानेवारी २०२३ पर्यंतची वेळ देखील युजर्सना देण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वीच ॲपलच्या ॲप स्टोअर आणि गुगल प्ले स्टोअरवरूनही गुगल हँगआउट हा ॲप काढून टाकण्यात आला आहे. तसेच ‘हॅंगआऊट’ची वेब आवृत्तीही १ नोव्हेंबरपासून गुगल चॅटमध्ये रुपांतरीत होणार आहे. गुगलने ‘गुगल प्लस’ आणि ‘गुगल हँगआऊट’ २०१३ मध्ये लॉन्च केले होते. तसेच आता जरी गुगल हँगआऊटची जागा गुगळे चॅट्सने घेतली असली तरी जर युजर्सनी ‘हँगआऊट’वरील चॅट डिलिट केले तर ते ‘गुगल चॅट’वरूनही डिलिट होणार आहे.
नवीन ॲप आणि वेब व्हर्जनमध्ये यूजर्सना चॅटिंगसाठी ‘जीआयएफ’ (GIF) आणि इमोजीची सुविधाही उपल्बध आहे. असे अनेक अत्याधुनिक फिचर्स युजर्सना ‘गुगल चॅट’मध्ये देण्यात आले आहेत.गुगलने २०१३ मध्ये प्रथम ‘गुगल प्लस’ लाँच केले होते व त्यानंतर त्याचवर्षी गुगल हँगआऊट देखील लाँच करण्यात आले होते. मात्र आता या हँगआऊटची जागाही गुगळे चॅटने घेतली आहे.