राजपथावर तटरक्षक दलाचं नेतृत्व करणार 'सांगली'ची कन्या!

    24-Jan-2022
Total Views | 170

Apurva Hore
 
 
 
पुणे : यंदाच्या प्रजासत्ताक दिनी नवी दिल्लीत होणाऱ्या संचलनात तटरक्षक दलाचं नेतृत्व करण्याची संधी सांगलीतल्या कन्येला मिळाली आहे. अपूर्वा गौतम होरे असे या वाळवा तालुक्यात राहणाऱ्या मुलीचे नाव आहे. तटरक्षक दलाच्या १६० जणांच्या तुकडीचे त्या नेतृत्व करणार आहेत. गेल्या तीन वर्षांपासून त्या पोरबंदर इथल्या नौदलाच्या विभागात असिस्टंट कमांडंट पदावर कार्यरत आहेत. यूपीएससी परीक्षेत त्या राज्यात पहिल्या तर देशात सहाव्या आल्या होत्या. नेव्हल अॅकॅडमीतल्या ट्रेनिंगमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना 'अँकर' पुरस्काराने गौरविण्यातही आले होते.
 
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121