Tokyo Paralympic 2020 : उम्मीद अब भी बाकी है...

Tokyo Paralympic 2020 : अजूनही आशा बाकी आहे...

    02-Sep-2021
Total Views |

Paralympic_1  H
 
टोकियो : भारतीय खेळाडूंनी टोकियो येथे होणाऱ्या पॅरालिम्पिक २०२०मध्ये आत्तापर्यंत तब्बल १० पदके पटकावली आहेत. मात्र, गेल्या २ दिवसांमध्ये भारताच्या एका खेळाडूला पदक जिंकता आलेले नाही. मात्र, काही भारतीय खेळाडूंची कामगिरी ही उल्लेखनीय ठरली असून पदके जिंकता आलेले नाहीत.
 
 
राहुल जाखर मिक्स्ड २५ मीटर पिस्तूल स्पर्धेत अंतिम फेरी गाठली
 
 
भारताचा राहुल जाखर टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये पी ३ मिक्स्ड २५ मीटर पिस्तूल एसएच १ इव्हेंटच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. पात्रता फेरीमध्ये ५७६ गुणांसह तो दुसऱ्या स्थानावर राहिला. त्यामुळे आता आणखी एका पदकाची अपेक्षा या खेळाडूकडून केली जात आहे.
 
 
महाराष्ट्राचा सुयश जाधव अंतिम फेरीत ठरला अपात्र
 
 
महाराष्ट्राचा जलतरणपटू सुयश जाधवला नियमाचे उल्लंघन केल्यामुळे पुरुषांच्या १०० मीटर बॅकस्ट्रोक स्पर्धेत अपात्र ठरवण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, दिव्यांगांचा जागतिक जलतरण नियम क्रमांक ११.४.१ सुयशने मोडला. सुरुवात केल्यानंतर पहिल्या बे्रस्टस्ट्रोक किकच्या आधी आणि नंतर एकच बटरफ्लाय किकला परवानगी असते, असे हा नियम सांगतो. सुयश आजारपणामुळे २०० मीटर वैयक्तिकमध्ये सहभागी होऊ शकला नाही.
 
 
बॅडमिंटनपटू प्रमोद भगत यांची विजयी सुरुवात
 
 
जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेला भारताचा बॅडमिंटनपटू प्रमोद भगतने पहिल्याचा सामन्यात विजय मिळवला. पुरुष एकेरीच्या एसएल-३ श्रेणीतील ‘अ‘ गटाच्या सामन्यात भगतने भारताच्याच मनोज सरकारचा २१-१०, २१-२३, २१-९ असा पराभव केला. मात्र, मिश्र दुहेरीमध्ये पलक कोहली सोबत लुकास मझूर आणि फॉस्टिन नोएल या जोडीविरुद्ध खेळताना पराभवाचा सामना करावा लागला.
 
 
पलक कोहलीची कमाल कामगिरी
 
 
तरुण पलक कोहलीने पहिल्या सामन्यातील पराभवामुळे निराश न होता दुसऱ्या सामन्यात आठव्या मानांकित तुर्कीच्या झेहराला २१-१२, २१-१८ ने नमवले आहे. त्यामुळे आता तिच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्याच्या आशा वाढल्या आहेत.
 
 
सुवर्ण पदक विजेती नेमबाज अवनी लेखरा अपयशी
 
नेमबाजीत १० मीटर एअर रायफलमध्ये सुवर्ण पदक पटकावणाऱ्या अवनीचे १० मीटर एअर रायफल प्रोन मिश्र प्रकारात पात्रता फेरी पार करू शकली नाही. अवनीने एकूण ६२९.७ गुणांसह २७वा क्रमांक मिळवला. पुरुषांमध्ये सिद्धार्थ बाबूने ६२५.५ गुण आणि दीपक कुमारने ६२४.९ गुण मिळवत अनुक्रमे ४०वा आणि ४३वा क्रमांक मिळवला.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121