नवी दिल्ली : सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल कंपन्यांनी घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढवत सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमती वाढवल्या. देशातील सर्वात मोठी सरकारी तेल कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (IOC) ने विनाअनुदानित १४.३२ गॅस सिलिंडरच्या किमतीत २५ रुपयांनी वाढ झाली आहे. १९ किलोंचा व्यावसायिक गॅस सिलिंडर आता किंमतीत ७५ रुपयांनी वाढ झाली आहे.