मुंबई : एकीकडे भारताला २ सुवर्णसहित ८ पदके मिळाली असताना आता एक पदक काढून घेण्यात आले आहे. नुकतेच टोकियो पॅरालिम्पिकच्या आयोजन समितीने हा निर्णय जाहीर केला आहे. भारतीय थाळीफेकपटू विनोद कुमार यांनी एफ - ५२ गटात कांस्य पदक पटकावले. यानंतर विनोद कुमार हे या विभागातील नियमात बसत नसल्याचे सांगत प्रतिस्पर्धी खेळाडूंनी आपेक्ष नोंदवला. तेव्हा तपासाअंती त्यांच्याकडून कांस्य पदक काढून घेण्याचा निर्णय आयोजन समितीने घेतला.
नेमके प्रकरण काय?
भारतीय खेळाडू विनोद कुमार यांनी रविवारी २९ ऑगस्ट रोजी १९.९१ मीटर लांब थाली फेकत कांस्य पदक पटकावले. तेव्हा प्रतिस्पर्धी खेळाडूंनी विनोद कुमार हे एफ़५२ गटाच्या विभागासाठी असलेल्या नियमांमध्ये बसत नसल्याचे सांगत आपेक्ष नोंदवला. तेव्हा आयोजन समितीने विनोद कुमार यांचे पदक राखून ठेवण्याचा निर्णय घेतला. तपासामध्ये विनोद कुमार या कॅटिगरीसाठी पात्र ठरले नाहीत. तेव्हा आयोजन समितीने त्यांचे पदक काढून घेतले. यासंदर्भात भारताचे मिशन प्रमुख गुरशरण सिंग यांनीदेखील हे स्पष्ट केले आहे.