वेतन मिळत नसल्याने एसटी कर्मचारी हवालदिल
मुंबई : राज्यातील ९० हजार एसटी कर्मचाऱ्यांना वेतन वेळेवर मिळत नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचे उघड झाले आहे. वेतन मिळत नसल्याने एसटी कर्मचारी हवालदिल झाले आहेत.
दर महिन्याला एसटी कर्मचाऱ्यांचा पगार सात तारखेला होत असतो. गेले दोन महिने एसटी कर्मचाऱ्यांचा पगार उशिरा होत आहे. ऑगस्ट संपत आला तरीही पगाराची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांची चिंता वाढली आहे.
कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होण्यासाठी संघटनेने अनेकवेळा मंत्री अनिल परब यांना निवेदन दिले होते. तरीही एसटी कर्मचाऱ्यांकडे परब यांचे दुर्लक्ष होत आहे. नाईलाजाने एसटी कर्मचार्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलणे सुरू केले आहे.
अहमदपूर, तेल्हारा, शहादा, कंधार आणि साक्री अशा अनेक ठिकाणी एस.टी. कर्मचार्यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. नाशिक आणि इतरही भागात त्यानंतर आत्महत्यांचे सत्र सुरूच राहिले. या घटनांनी राज्यभरात एसटी कर्मचार्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे,” असे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. राज्यात एसटी कर्मचाऱ्याचे वेतनासंदर्भात प्रश्न सोडवण्यात यावा यासाठी फडणवीस यांनी मुख्यमंत्री यांना पत्र दिले आहे.