‘इसिस’चे काबूलमध्ये साखळी बॉम्बस्फोट ९० जण ठार; १५० हून अधिक जखमी

‘इसिस’चे काबूलमध्ये साखळी बॉम्बस्फोट ९० जण ठार; १५० हून अधिक जखमी

    27-Aug-2021
Total Views |
kb_1  H x W: 0  
 
‘इसिस’चे काबूलमध्ये साखळी बॉम्बस्फोट १५ जण ठार; ७७ जखमी
 
 
काबूल : तालिबानच्या दहशतीमुळे अफगाणिस्तानातून बाहेर पडण्यासाठी नागरिकांची धडपड सुरु असतानाच ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेने गुरुवार, दि. २६ ऑगस्ट रोजी काबूल विमानतळ परिसरात साखळी बॉम्बस्फोट घडवले. ‘इसिस’च्या दहशतवाद्यांनी गुरुवारी रात्री दोन आत्मघातकी स्फोट घडवून आणले यात अंदाजे ९० जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १५० हून अधिक जखमी झाल्याची माहिती आहे. आधीच तालिबानच्या दहशतीमुळे जीव मुठीत घेऊन राहावे लागत असतानाच ‘इसिस’नेही आता येथे बॉम्बस्फोटांची मालिका घडवल्याने दुष्काळात तेरावा महिना अशी येथील नागरिकांची परिस्थिती झाली आहे.
 
 
तालिबानने कब्जा मिळविल्यानंतर अफगाणिस्तान सोडण्यासाठी काबूल विमानतळ परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. अफगाणिस्तानातून बाहेर पडण्यासाठी नागरिकांची धडपड सुरु आहे. गुरुवारी काबूल विमानतळ परिसरात ‘इसिस’च्या दहशतवाद्यांनी दोन आत्मघातकी हल्ले घडवले. काबूल विमानतळाच्या प्रवेशद्वार परिसरात पहिला आत्मघातकी बॉम्बस्फोट झाला. या बॉम्बस्फोटानंतर सर्वत्र नागरिकांची पळापळ सुरु झाली. या स्फोटातून सावरत नाही तोच आणखी एक आत्मघातकी बॉम्बस्फोट घडल्याने काबूल शहर हादरले. गुरुवारी रात्री उशीरापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार काबूलमध्ये १५ जणांचा मृत्यू झाला होता, तर ७७ नागरिक जखमी झाल्याची माहिती आहे. यामध्ये काही लहान मुलांचाही समावेश असून त्याचबरोबर तीन अमेरिकन नागरिकदेखील असल्याचे समजते.
 
 
अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनने काबूल विमानतळावर दहशतवादी हल्ल्याची भीती व्यक्त केली होती. त्याचबरोबर आपल्या देशातील नागरिकांना विमानतळापासून दूर राहण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. अखेर तसेच घडले. काबूल विमानतळाच्या ऐबी गेटच्या बाहेर आत्मघातकी हल्ला झाला. हल्लेखोर गोळीबार करत आला आणि स्वत:ला स्फोटकांनी उडवून दिले असे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. विमानतळाच्या या गेटवर ब्रिटनचे सैनिक तैनात असल्याची माहिती आहे. तर दुसरा आत्मघातकी हल्ला हॉटेलबाहेर झाला. पाश्चिमात्य देशातील सैनिकांना या माध्यमातून लक्ष्य करण्याचे हल्लेखोरांचा प्रयत्न असल्याचे दिसून आले. काबूलनंतर कझाकिस्तानच्या ताराज शहरात स्फोट झाल्याची माहिती असून या सर्व साखळी बॉम्बस्फोटांची जबाबदारी इसिस या दहशतवादी संघटनेने स्वीकारल्याचे वृत्त आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121