तालिबानचा गोळीबार; नागरिकांची चेंगराचेंगरी, 7 जण ठार
काबूल : कोणावरही हल्ला करणार नसल्याचा दावा करणार्या तालिबानी फौजांनी काबूल विमानतळ परिसरात रविवार, दि. 22 ऑगस्ट रोजी गोळीबार केल्याचा खळबळजनक प्रकार घडला. तालिबानी फौजांनी केलेल्या या गोळीबारामुळे नागरिकांची चेंगराचेंगरी होऊन सात जणांचा मृत्यू झाला. काही जण जखमीही झाल्याची माहिती आहे.तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यापासून अनेक नागरिक देश सोडण्यासाठी धडपड करत आहेत. काबूल विमानतळासह सभोवतालच्या परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र आहे. देश सोडण्यासाठी विमानतळाच्या आत प्रवेश करण्यासाठी नागरिकांची सर्वत्र धावपळ सुरु आहे. तर देशातील नागरिकांना रोखण्याचे प्रयत्न सध्या तालिबानकडून होताना दिसत आहेत. रविवारी अशाच प्रकारे काबूल विमानतळामध्ये प्रवेश करण्याच्या प्रयत्नांत असणार्या काही नागरिकांना रोखण्यासाठी तालिबानी फौजांनी या परिसरात गोळीबार केला. यामुळे सर्वत्र नागरिकांची पळापळ सुरु झाली. यादरम्यान चेंगराचेंगरी होऊन सात जणांचा जागीच मृत्यू झाला, तर इथले संपत नाही...!
आम्ही कोणावरही हल्ला करणार नसल्याचा दावा करणार्या तालिबानी फौजांनी काबूल विमानतळ परिसरात रविवार, दि. 22 ऑगस्ट रोजी गोळीबार केल्याचा खळबळजनक प्रकार घडला. तालिबानी फौजांनी केलेल्या या गोळीबारामुळे नागरिकांची चेंगराचेंगरी होऊन सात जणांचा मृत्यू झाला. काही जण जखमीही झाल्याची माहिती आहे.तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्या काही नागरिक जखमी झाल्याची माहिती आहे. येथे उपस्थित असलेल्या ब्रिटनच्या सैन्यांनी तालिबान फौजांकडून गोळीबार झाल्याचा दावा केला.
परिस्थिती भीषण आणि आव्हानात्मक
काबूल विमानतळ परिसरातील स्थिती अतिशय भीषण आणि आव्हानात्मक बनली आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासह नागरिकांच्या सुरक्षेसाठी पूर्ण प्रयत्न केले जात आहेत, असे ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले. विमानतळावरील चेंगराचेंगरीच्या स्थितीला अमेरिका जबाबदार असल्याचा आरोप तालिबानने केला आहे. अमेरिका आणि तिची प्रशासकीय यंत्रणा विमानतळावर नियंत्रण राखण्यात अपयशी ठरली आहे. अफगाणिस्तानमध्ये सर्वत्र शांतता आहे. पण फक्त काबूल विमानतळावर गोंधळाची स्थिती आहे, असा आरोप तालिबानकडून करण्यात येत आहे.