डॉ. हेडगेवार विशेषांकानिमित्त ‘संघमंत्राची अभिव्यक्ती’ व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प

    07-Jun-2021
Total Views | 52

RSS_1  H x W: 0



मुंबई : रा.स्व. संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचा २१ जून हा स्मृतिदिवस आहे. या स्मृतिदिनाप्रीत्यर्थ सा. ‘विवेक’ त्यांच्या निवडक विचारसूत्रांवर कालसापेक्ष भाष्य करणारा ‘संघमंत्राचे उद्गाते - डॉ. हेडगेवार’ हा विशेषांक प्रकाशित करणार आहे.


हेच औचित्य साधून डॉक्टरांच्या विचारसूत्रांचा अधिकाधिक प्रसार व्हावा म्हणून आजच्या प्रभावी असलेल्या ‘डिजिटल’ माध्यमातून हे विचारमंथन व्हावे, याकरिता ‘विवेक’च्या फेसबुक आणि युट्यूबच्या माध्यमातून आपण याआधीही ‘संघमंत्र व्याख्यानमाला’ सादर केली होती. या व्याख्यानमालेला मिळालेल्या उदंड प्रतिसादाची ऊर्जा घेऊन सा. ‘विवेक’ आपल्यासमोर ‘संघमंत्राची अभिव्यक्ती’ ही व्याख्यानमाला घेऊन आले आहे.



‘संघमंत्राची अभिव्यक्ती’ व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प रा. स्व. संघाचे महाराष्ट्र प्रांत, संपर्कप्रमुख रवींद्र उर्फ राजाभाऊ मुळे यांनी गुंफले. राजाभाऊ मुळे यांनी त्यावेळच्या नगर जिल्ह्यातील प्रतिकूल परिस्थितीत संघ कसा स्थिरावला, रुजला, बहरला याविषयी सोदाहरण भाष्य केले. त्यावेळेस नगर जिल्हा सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिकदृष्ट्या सजग असलेला जिल्हा होता. तसेच या जिल्ह्यात काँग्रेस, कम्युनिस्ट, समाजवादी, अशा सर्व विचारधारांना पोषक वातावरण होते आणि त्याच विचारधारांचा प्रभाव जिल्ह्यावर होता.


अशा प्रतिकूल वातावरणात नागपूर येथून संघसंस्काराची शिदोरी घेऊन गेलेल्या स्वयंसेवकांनी प्रतिकूल परिस्थितीत संघ शाखा नगरमध्येे सुरू केल्या. अशा प्रतिकूल हिंदू समाजाचे संघटन व्हायला हवे, यासाठी पूजनीय डॉक्टरांनी बाबूराव मोरे या विद्यार्थ्याला नगरमध्ये शिक्षण पूर्ण करता (पान ६ वर) संस्थेचे अध्यक्ष, रमेश पतंगे यांनी प्रास्ताविक केले.


पूजनीय डॉ. हेडगेवार आणि महात्मा गांधी यांच्या संवादातील स्वयंसेवक म्हणजे काय? या गांधीजींच्या प्रश्नावर, डॉक्टरांनी दिलेले उत्तर, “देशाच्या सर्वांगीण विकासासाठी जो आत्मीयतेने आपले सारं सर्वस्व अर्पण करण्यास सिद्ध होतो, अशा नेत्याला आम्ही स्वयंसेवक समजतो. असे स्वयंसेवक घडविण्यावर संघाचे लक्ष्य आहे.”


पूजनीय डॉक्टरांच्या सोबत असलेले पहिल्या पिढीचे अगदी त्यांच्या निकट असे जे बालकिशोर स्वयंसेवक होते, त्यांच्या जीवनासंबंधी, त्यांना डॉक्टरांनी सुरू केलेला संघ कसा समजला आणि आपल्या जीवनात त्यांनी तो कसा व्यक्त केला, याचे विवेचन रवींद्र जोशी यांनी केले.


पूजनीय डॉक्टरांचे सान्निध्य लाभलेले बाबासाहेब आपटे, दादाराव परमार्थ, आप्पाजी जोशी, यादवराव जोशी, एकनाथजी रानडे, बाळासाहेब देवरस, भाऊराव देवरस, मोरोपंत पिंगळे, लक्ष्मणराव भिडे, अशी ही विदर्भातील संघनिष्ठांची मांदियाळी असलेली मंडळी डॉक्टरांसोबत होती. या सर्वांचा ओझरता स्पर्श रवींद्र जोशी यांनी केला. ‘तुझे तेज अंगी शतांशे जरीही उजाळून देऊ दिशा दाही दाही’ या कवितेच्या ओळी डॉक्टरांच्या सान्निध्यात असलेल्या या पहिल्या पिढीतील स्वयंसेवकांनी उजळून दाखविल्या.


२१ जून ही तारीख पूजनीय डॉक्टरांच्या देहत्यागाची तारीख आहे. यासंबंधी यादवराव जोशी यांची एक आठवण रवींद्र जोशी यांनी सांगितली, “संघाच्या प्रत्येक स्वयंसेवकांच्या रूपाने डॉ. हेडगेवार जीवित आहेत, त्यांचे कार्य हे डॉ. हेडगेवारांचे कार्य असेल.” याचा अर्थ प्रत्येक स्वयंसेवकावर किती मोठी जबाबदारी आहे, याविषयी रवींद्र जोशी यांनी मांडणी केली.पूजनीय डॉक्टरांच्या सोबत असलेले पहिल्या पिढीचे अगदी त्यांच्या निकट असे जे बालकिशोर स्वयंसेवक होते, त्यांच्या जीवनासंबंधी, त्यांना डॉक्टरांनी सुरु केलेला संघ कसा समजला आणि आपल्या जीवनात त्यांनी तो कसा व्यक्त केला, याचे विवेचन रवींद्र जोशी यांनी केले.


पूजनीय डॉक्टरांचे सान्निध्य लाभलेले बाबासाहेब आपटे, दादाराव परमार्थ, आप्पाजी जोशी, यादवराव जोशी, एकनाथजी रानडे, बाळासाहेब देवरस, भाऊराव देवरस, मोरोपंत पिंगळे, लक्ष्मणराव भिडे अशी ही विदर्भातील संघनिष्ठांची मांदियाळी असलेली मंडळी डॉक्टरांसोबत होती. या सर्वांचा ओझरता स्पर्श रवींद्र जोशी यांनी केला. ‘तुझे तेज अंगी शतांशे जरीही उजाळून देवू दिशा दाही दाही’ या कवितेच्या ओळी डॉक्टरांच्या सान्निध्यात असलेल्या या पहिल्या पिढीतील स्वयंसेवकानी उजळून दाखविल्या.


२१ जून ही तारीख पूजनीय डॉक्टरांच्या देहत्यागाची तारीख आहे. यासंबंधी यादवराव जोशी यांची एक आठवण रवींद्र जोशी यांनी सांगितली,‘संघाच्या प्रत्येक स्वयंसेवकांच्या रुपाने डॉ. हेडगेवार जिवीत आहेत, त्यांचे कार्य हे डॉ. हेडगेवारांचे कार्य असेल.’ याचा अर्थ प्रत्येक स्वयंसेवकावर किती मोठी जबाबादारी आहे, याविषयी रवींद्र जोशी यांनी मांडणी केली.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121