हंगेरियन जनतेचा राष्ट्रवाद

    04-Jun-2021   
Total Views | 337

jp_1  H x W: 0


कुठेही असले तरी मुस्लीम व्यक्ती पाच वेळचे नमाज अगदी रस्ता आणि कामाच्या ठिकाणीही अदा करतात, हे आपण पाहतो. मग मुस्लीम राष्ट्र असलेल्या पाकिस्तानमध्ये तर लोक नमाज प्राधान्याने पढत असतील. पण, या पाकिस्तानमध्ये चिनी कंपन्यांनी या कर्मचार्‍यांना कंपनीत कामाच्या वेळेस नमाज पडण्यास मनाई केली आहे. हा चिनी कंपन्यांचा नियम पाकिस्तानी मुस्लीम इमानेइतबारे पाळतातही.... तर अशीही चीनची दहशत.



हंगेरीच्या राजधानीमध्ये पाच मोठ्या रस्त्यांना नावं देण्यात येणार आहेत. त्यातील पहिल्या रस्त्याचे नाव ‘प्री हाँगकाँग रोड’, दुसर्‍या रस्त्याचे नाव ‘दलाई लामा रोड’, तिसर्‍या रस्त्याचे नाव ‘उघूर शहीद रोड’, चौथ्या रस्त्याचे नाव ‘बिशप झि शिगाँग रोड’ (या बिशपांना चीनने तुरुंगात डांबले होते.), “हे रस्ते हंगेरीमधल्या चिनी विद्यापीठाच्या आजूबाजूलाच असणार,” असे बुडापेस्टचे महापौर ग्रेगली काराक्सोनी यांनी जाहीर केले. त्यांच्या या निर्णयाला हंगेरी देशातील बहुसंख्य लोकांनी उत्साहाने पाठिंबा दिला आहे. गेल्या वर्षापासूनच हंगेरीमध्ये सत्ताधारी पक्ष विरुद्ध विरोधी पक्ष यांचा संघर्ष सुरूच आहे. कारण आहे सगळ्यांचाच नकारात्मक चर्चेत असलेला चीन. चीनने जगभरात छोट्या-छोट्या राष्ट्रांना कर्ज दिले. कर्जाच्या बदल्यात त्या राष्ट्रांमध्ये विकासाच्या नावाने काही प्रकल्प उभारायचे, मात्र ते प्रकल्प चिनी साम्राज्यवाढीसाठी वापरायचे अशी चीनची खेळी. या खेळीत पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका यांनी चीनच्या मदतीपाठीमागचा विस्तारवादी लबाड चेहरा चांगलाच अनुभवला. त्यामुळे या देशांमध्ये कोणाची राजसत्ता यावी, कोणते कायदे यावेत, या देशांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणत्या देशाशी मैत्री वा शत्र्ाुत्व घ्यायचे, याबाबतही निर्णय चीनच घेतो. याचे एक समर्पक उदाहरण म्हणजे पाकिस्तान. कुठेही असले तरी मुस्लीम व्यक्ती पाच वेळचे नमाज अगदी रस्ता आणि कामाच्या ठिकाणीही अदा करतात, हे आपण पाहतो. मग मुस्लीम राष्ट्र असलेल्या पाकिस्तानमध्ये तर लोक नमाज प्राधान्याने पढत असतील. पण, या पाकिस्तानमध्ये चिनी कंपन्यांनी या कर्मचार्‍यांना कंपनीत कामाच्या वेळेस नमाज पडण्यास मनाई केली आहे. हा चिनी कंपन्यांचा नियम पाकिस्तानी मुस्लीम इमानेइतबारे पाळतातही.... तर अशीही चीनची दहशत.


तर या पार्श्वभूमीवर चीनने पूर्व युरोपमध्येही शिरकाव करण्याचा प्रयत्न केला. पूर्व युरोपमधील हंगेरी या देशाशी चीनने सुत जुळवले. हंगेरीने बुडापेस्ट ते बेलग्रेडमध्ये रेल्वेमार्ग बांधण्यासाठी चीनकडून दोन दशलक्ष कर्ज घेतले. बेलग्रेड हासुद्धा सायबेरियामधीन चीनचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला भूभाग. चीनने हंगेरीच्या विकासास भरघोस आर्थिक मदत करू, असा बहाणा केला. पूर्व युरोपमधील इतर युरोपीय देशांना काटशह देण्यासाठी आणि काही प्रस्थापित युरोपीय देशांच्या तुलनेत स्थापित होण्यासाठी हंगेरीच्या राजसत्तेने चीनच्या दोस्तीला पायघड्या घातल्या. हंगेरीचे पंतप्रधान व्हिक्टर ऑर्बन यांनी चीनवर विश्वास ठेवला. चीनने हंगेरीसमोर प्रस्ताव ठेवला की, चीन हंगेरीच्या राजधानीत बुडापेस्टमध्ये चिनी विद्यापीठाअंतर्गत सर्वोच्च क्षमतेचे आणि आधुनिक सुविधायुक्त विद्यापीठ उभे करेल. एकाच वेळी आठ हजार विद्यार्थी इथे अध्ययन करू शकतात इतके मोठे विद्यापीठ. त्यासाठी हंगेरी सरकारने बुडापेस्ट या आपल्या राजधानीतली काही एकर जागा चीनला उपलब्ध करून दिली. चीनने प्रस्ताव सादर केला आहे की, या विद्यापीठासाठी काही टक्के खर्च हंगेरीने उचलावा, बाकी खर्च चीन उचलेल. तसेच या विद्यापीठासाठी चीन कर्जही हंगेरीला द्यायला तयार आहे. २०२४ सालपर्यंत हे विद्यापीठ तयार होईल, असे म्हटले जाते. या विद्यापीठातून शिकलेल्या हंगेरियन विद्यार्थ्यांना जगभरात चांगल्या नोकरीची आणि व्यवसायउदिमाची संधी उपलब्ध केली जाणार आहे.

मात्र, हंगेरीमध्ये चीनबद्दल वातावरण चांगलेच तापलेले दिसते. त्याचे कारण आपण कोरोनाही समजू शकतो. आता चीनमधील कम्युनिस्ट राजसत्तेची दडपशाही जगजाहीर झाली आहे. त्यामुळे हंगेरीमध्ये चीनच्या विद्यापीठनिर्मितीला ६६टक्के हंगेरियन जनतेने तीव्र विरोध दर्शविली आहे. चीनचे इथे काहीच नको, असे या लोकांचे म्हणणे. हंगेरीमध्ये या घडामोडी घडत असताना आठवण येते ती एका घटनेची; ती घटना प्रसिद्ध झाली होती. भारत-चीन सीमावादावर तणाव सुरू असताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे चीनच्या राजदूतास लपूनछपून भेटायला गेले होते म्हणे. पण, राहुल म्हणजे देश तर अजिबात नाही. त्यामुळे हंगेरीचे लोक ज्याप्रमाणे चीनला विरोध करत आहेत, त्याच किंवा त्याहीपेक्षा जास्त भारतीय लोक चीनच्या विरोधात आहेत. धूर्त, लबाड अशा चीनला जगभरात आता नाकारले जात आहे. हंगेरी आणि चीनचे संबंध हे उत्तम उदाहरण म्हणता येईल. हंगेरियन जनतेचा हा राष्ट्रवाद नक्कीच यशस्वी होईल.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121