सा. ‘विवेक’तर्फे आयोजित ‘संघमंत्राची अभिव्यक्ती’ व्याख्यानमाला

    04-Jun-2021
Total Views | 91

RSS_1  H x W: 0


‘संघमंत्राचे उद्गाते-डॉ. हेडगेवार’
 
मुंबई : आद्य सरसंघचालक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचा दि. 21 जून रोजी स्मृतिदिन आहे. या स्मृतिदिनाप्रीत्यर्थ त्यांच्या निवडक विचारसूत्रांवर कालसापेक्ष भाष्य करणारा ‘संघमंत्राचे उद्गाते - डॉ. हेडगेवार’ विशेषांक सा. ‘विवेक’तर्फे प्रकाशित केला जाणार आहे. याचेच औचित्य साधून या विशेषांकाचा प्रसार अधिकाधिक व्हावा, यासाठी आजच्या युगातील प्रभावी माध्यम असलेल्या सोशल मीडियाद्वारे डिजिटल माध्यमातून विचारमंथन व्हावे याकरिता ‘विवेक’च्या फेसबुक व युट्यूबच्या माध्यमातून आपण यापूर्वी ‘संघमंत्र व्याख्यानमाला’आयोजित करण्यात आली होती आणि त्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसादही मिळाला.


मिळालेल्या याच उदंड प्रतिसादाची ऊर्जा घेऊन सा.‘विवेक’ पुढील व्याखनमाला ‘संघमत्राची अभिव्यक्ती’ आपल्यासमोर घेऊन येत आहे. ही व्याख्यानमाला दि. 5 जून ते 8 जून, संध्याकाळी 7 वाजता आयोजित करण्यात आली आहे. यात एकूण चार व्याख्यानांचा समावेश असणार आहे. 5 जून रोजी रवींद्र जोशी-अखिल भारतीय संयोजक, कुटुंब प्रबोधन गतिविधी, 6 जून रोजी रवीकुमार अय्यर - संपर्क टोळी सदस्य, रवींद्र (राजाभाऊ) मुळे - संपर्क प्रमुख प. महाराष्ट्र प्रांत, रा. स्व. संघ आणि चंदाताई (भाग्यश्री) साठ्ये - अखिल भारतीय सहसंयोजक महिला समन्वय या वक्त्यांचे विचारमंथन आपल्याला ऐकायला मिळणार आहे. व्याख्यानमालेत सहभागी होण्यासाठी ‘विवेक’च्या फेसबुक आणि युट्यूब चॅनेलला आपण भेट देऊ शकता.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121