मुंबई : मध्य रेल्वे महिला कल्याण संघटनेने (सीआरडब्ल्यूडब्ल्यूओ) दि. २५.६.२०२१ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे महिला कर्मचार्यांसाठी शासनाच्या निर्देशांचे पालन करून जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन आणि रजोनिवृत्ती याचा भाग म्हणून जागरूकता चर्चा आयोजित केली. यावेळी श्रीमती तनूजा कंसल अध्यक्षा, मध्य रेल्वे महिला कल्याण संघटना (सीआरडब्ल्यूडब्ल्यूओ ) यांनी महिला कर्मचार्यांशी संवाद साधला.
कुटुंब व संघटनेचा आधार बनण्यास प्रोत्साहित केले. त्या असेही म्हणाल्या की, महिलांनी स्वत: उच्च स्थान गाठले आहे आणि अनेक वर्षांपासून कुटुंब व कार्यालयात कर्तव्याचे संतुलन साधत आर्थिक स्वातंत्र्य मिळवून आत्मनीर्भर झाल्या आहेत. हे लक्षात घेण्याजोगे आहे की सीआरडब्ल्यूडब्ल्यूओ आपले दैनंदिन कामकाज आभासी व्हर्च्युअल मीटिंग, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सारख्या नवीन कल्पनांसह करीत आहे. अनेक वेळा सीआरडब्ल्यूडब्ल्यूओने सर्वसाधारणपणे रेल्वे कर्मचार्यांना आणि विशेषतः महिला कर्मचार्यांना मुखपट्टी, सॅनिटायझर आणि किराणा किट इत्यादीच्या रूपात वाटप केले आहे.
प्रख्यात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अंजू हजारी यांनी महिला रेल्वे कर्मचा-यांच्या हितासाठी या कार्यक्रमाचे सादरीकरण केले. त्यांनी कर्मचार्यांशी संवाद साधला आणि कर्मचार्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. कंसल यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील महिला प्रतीक्षालयाला भेट दिली, रेल्वे कर्मचा-यांशी संवाद साधला आणि सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप केले. महिला प्रतिक्षालयात सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन आणि इन्सीनेटर बसविण्यात आल्याचेही त्यांना सांगण्यात आले. याप्रसंगी सर्व कोविड १९ प्रोटोकॉलचे अनुसरण करण्यात आले.