जपान : 'टोयोटा रिसर्च इन्स्टिट्यूट (टीआरआय)' चे 'रोबोटिक्स', 'वाईस प्रेसिडेंट ,मॅक्स बजराचार्य' म्हणतात, हे नवीन तंत्रज्ञान मानवांची क्षमता अधिक वाढविण्यासाठी विकसित केले जात आहे,त्यांची जागा घेण्यासाठी नाही.बॉट्स इतर रोबोट्ससाठी गोंधळात टाकणार्या परिस्थितीत ऑपरेट करू शकतात.
उदाहरणार्थ, टीआरआयची नोंद आहे की घरात सापडलेल्या पारदर्शक किंवा परावर्तित वस्तू रोबोट्सला गोंधळात टाकतात. ते ग्लास टेबल, चमकदार टोस्टर किंवा पारदर्शक कप यांना बघून गोंधळात पडतात , कारण बहुतेक रोबोट्स संदर्भात विचार न करता त्यांच्यासमोर असलेल्या वस्तूंवर प्रतिक्रिया देण्यासाठी प्रोग्राम केलेले असतात.
यावर मात करण्यासाठी, टीआरआय रोबोट्सला हे दृश्य थ्रीडी मध्ये पाहण्याचे प्रशिक्षण देत आहे आणि त्याद्वारे वस्तू आणि पृष्ठभाग शोधण्यास सक्षम करत आहे जेणेकरून घरातील काम करताना त्यांचा गोंधळ उडू नये . भूतकाळातील अपयशापासून त्वरित शिकून सिस्टमला प्रशिक्षण देण्यासाठी संशोधक मोठ्या प्रमाणात सिंथेटिक डेटा वापरत आहेत.