मंदिर निर्माण कार्य बदनामीचा कट उधळला : जाणून घ्या संपूर्ण इतिहास
नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिर निर्माण व्हावे ही जगभरातील तमाम हिंदूंची इच्छा. मात्र, निर्माणात अडथळा निर्माण करणाऱ्या काही विघातक शक्ती गेल्या कित्येक वर्षांपासून कार्यरत आहेत. अयोध्येत राम मंदिर अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी खरेदी केलेल्या जमिन व्यवहारात घोटाळा झाला, अशा वावड्या गेल्या काही दिवसांपासून उठवल्या जात आहेत. मात्र एका हिंदी वृत्तपत्राने केलेल्या पडताळणीत अनेक धक्कादायक गोष्टी उघड झाल्या आहेत. व्यवहारात भ्रष्टाचाराचा आरोप करणारे माजी मंत्री तेज नारायण पांडे 'पवन' आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्याशी सुलतान यांचे खूप चांगले संबंध असल्याचेही तपासात आढळून आले आहे. याबाबतचे काही फोटोदेखील पुराव्या दाखल प्रसिद्ध हिंदी वृत्तपत्र 'दैनिक भास्कर'ने प्रसिद्ध केले आहे.
माजी मंत्री तेज नारायण पांडे या प्रकरणी प्रतिक्रीयेत म्हणतात, " हा आरोप सुलतान अन्सारी यांच्या म्हणण्यानुसार नव्हे तर तथ्यांच्या आधारे करण्यात आला आहे. पांडे म्हणाले की, आतापर्यंत राम मंदिराच्या जागेसंदर्भात पन्नासहून अधिक नोंदणी झाली आहे. प्रत्येकाची चौकशी झाली पाहिजे. यांनतर केलेले आरोप खरे आहेत की नाही हे स्पष्ट होईल. गेल्या चार वर्षांत त्यांनी १० करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. सुलतानच्या वडिलांनी २०११मध्ये बबलू पाठक यांच्याकडून ही जमीन खरेदी केली होती. बबलू आणि सुलतान हे दोघेही प्रॉपर्टी डीलिंगमध्ये काम करतात. ट्रस्टने सुलतानकडून १०० आणि बबलूकडून ८० बिस्वा जमीन ताब्यात घेतली आहे.
२०११ मध्ये सुलतान अन्सारी यांनी ही जमीन दोन कोटींच्या करारावर खरेदी केली. ट्रस्टला विक्री करण्यापूर्वी जुनी किंमत देऊन ती जमीन त्यांच्या नावावर झाली. बैनामा म्हणजे जमीन एखाद्याच्या नावे सरकारी कागदपत्रात ठेवणे. त्यानंतर त्यांनी ही जमीन ट्रस्टला १८ कोटी रुपयांना विकली. म्हणूनच, जमिनीची किंमत १० मिनिटांत नव्हे तर संपूर्ण दशकात २ कोटी रुपयांवरून १८ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. केंद्राने स्वत:च्या ताब्यात घेतलेली ७० एकर जमीनदेखील ट्रस्टला दिली आहे.
मंदिराचा विस्तार आणि बांधणी करण्याची योजना १०८ एकर क्षेत्रासाठी आहे, म्हणून आजूबाजूची जमीन घेणे आवश्यक होते. वादविवादात असलेल्या बाग बिजेसीची जमीन २०१० पूर्वी फिरोज खानच्या नावावर होती. फिरोजने २०१० मध्ये बबलू पाठक यांना १८० बिस्वा जमीन विकली. २०११ मध्ये या १०० पैकी बिस्वा भूमीवर बबलूने इरफान खान उर्फ नन्हें मियांयाच्या बरोबर करारावर स्वाक्षरी केली. त्याला १० लाख रुपये अॅडव्हान्स म्हणून मिळाले.
सुलतान अन्सारी हा नन्हें मियां यांचा एकुलता एक मुलगा आहे, ज्याची बबलू पाठकशी चांगली मैत्री आहे. कराराची वैधता केवळ तीन वर्षांसाठी आहे, म्हणून २०१५मध्ये बबलूने पुन्हा जमीन सुलतानच्या नावे परत केली. सुलतान दर तीन वर्षांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या नावाने करार करत राहिला. बबलूने थकित पैसे गोळा करण्यासाठी त्याच्यावर कधीही दबाव आणला नाही, ज्यावरून हे दिसून येते की दोघांची चांगली मैत्री होती. मार्च २०२१मध्ये ट्रस्टने बबलूंकडून ८० बिस्वा जमीन आणि सुलतानकडून १००बिस्वा खरेदी केली.
अयोध्येत जमीन दराची वाढ अनपेक्षित नाही, कारण बड्या व्यावसायिकांनी हॉटेल, मॉल्स आणि बाजार उघडण्यासाठी जमिनीचे व्यवहारकेले आहेत. उत्तर प्रदेश सरकार अनेक विकास प्रकल्पांसाठी जमीन घेत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या राममंदिराच्या निर्णयानंतर हा बदल झाला. जिल्ह्यातील जमीन किंमती बिस्वाच्या २० ते २५ लाख प्रत्येकी बिस्वाच्या दरम्यान आहे. राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनीही निवेदन प्रसिद्ध करून सर्वकाही स्पष्ट केले आहे.
‘झी न्यूज’ च्या वृत्तानुसार, राम मंदिर ट्रस्टवर जे आरोप करण्यात आले होते, अयोध्येत त्या जागेवर रवी मोहन तिवारी आणि सुलतान अन्सारी यांच्यात जमीन करार झाला होता. त्या जमिनीची मालकी कुसुम पाठक यांच्याकडे होती. २०१०-११ मध्येच त्यांनी ती मालकी घेतली. त्यानंतर १९ सप्टेंबर २०१९ रोजी कागदपत्रे तयार झाली आणि त्याची किंमत २ कोटी रुपये ठरली. म्हणूनच, २ वर्षानंतर पुन्हा त्याच दरानुसार या जमिनीचा सौदा झाला.
चंपतराय काय म्हणाले ?
चंपत राय म्हणाले की, "ज्या लोकांनी आरोप केले आहेत त्यांनी तीर्थक्षेत्रातील कोणत्याही अधिकाऱ्यांकडून आरोपात तथ्य जाणून घेतले नाही. यामुळे समाजात संभ्रम निर्माण झाला आहे. प्रभू श्रीराम भक्तांनी अशा कोणत्याही आरोपांवर विश्वास ठेवू नये अशी विनंती केली. ते म्हणाले की, श्रीराम जन्म-तीर्थक्षेत्र ट्रस्ट वास्तुशास्त्रानुसार भव्य मंदिर निर्माण करण्यासाठी, इतर सर्व संकुलांना सर्व बाबतीत सुरक्षित आणि पर्यटकांसाठी सोयीस्कर बनविण्यासाठी कार्य करीत आहे."
चंपत राय यांनी सांगितले की, "याच कारणासाठी बांधकाम चालू असलेल्या जागेत हद्दीत येणारी महत्वाची आणि मंदिराच्या पूर्वेकडील आणि पश्चिमेस तटबंदीच्या हद्दीत येणारी मंदिरे / ठिकाण परस्पर संमतीने खरेदी केली जात आहे. या प्रक्रियेत विस्थापित झालेल्या प्रत्येक संस्था / व्यक्तीचे पुनर्वसन केले जाईल हा ट्रस्टचा निर्णय आहे. पुनर्वसनासाठी जमीन निवड केवळ संबंधित संस्था / व्यक्तींच्या पूर्ण सहमतीने केली जात आहे."
"बाग बिजजेसी, अयोध्या येथील १.२० हेक्टर जमीन कौशल्या सदनासारख्या महत्त्वपूर्ण मंदिरांच्या संमतीने पूर्ण पारदर्शकतेने प्रक्रियेअंतर्गत खरेदी केली गेली आहे. अयोध्या रेल्वे स्थानकाशेजारील रस्त्यावर वसलेली ही मुख्य जागा असल्याचे त्यांनी नमूद केले. या जमिनीसंदर्भात, सन २०११ पासून हा करार उपस्थित विक्रेत्यांच्या नावे वेगवेगळ्या वेळी संपादित करण्यात आला (२०११, २०१७ आणि २०१९).
ते म्हणाले, “आमच्या वापरासाठी हा भूखंड योग्य असल्याचे आढळून आल्यानंतर संबंधित व्यक्तींशी संपर्क साधला. मागणी केलेल्या जागेचे मूल्य सध्याच्या बाजार मूल्याशी तुलना केली गेली. अंतिम देय रक्कम प्रति चौरस फूट सुमारे १४२३ चौ.फु. रुपये इतकी निश्चित करण्यात आली होती, जी जवळील भागाच्या सध्याच्या बाजार मूल्यापेक्षा खूपच कमी आहे. किंमतीवर सहमती झाल्यानंतर संबंधित व्यक्तींना त्यांचे पूर्वीचे कंत्राट पूर्ण करणे आवश्यक होते, तर केवळ संबंधित जमीन तीर्थक्षेत्राद्वारे मिळू शकते.