'झाकलेली मूठ कधी तरी उघडी पडणारच'

    26-May-2021
Total Views | 93

sunil deodhar_1 &nbs


ठाण्यात शिवसेना आमदाराच्या कार्यालयात झालेल्या मद्यवाटप कार्यक्रमाचा भाजप राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी घेतला समाचार



मुंबई :
ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघातील वागळे परिसरातील या नगरसेवकाने शिवसेना आमदार रवींद्र फाटक यांच्या कार्यालयात दारू वाटपाचा कार्यक्रम केला होता. त्यानंतर भाजपने शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी 'शिवसेनेने महाराष्ट्राची लाज घालवली' अशा शब्दांत निशाणा साधला आहे.


देवधर यांनी ट्विट केले आहे की, " मुळातच अंगी थिल्लरपणा भरलेल्या शिवसेनेच्या एका नगरसेवकाने सेनेचे आमदार रविंद्र फाटक यांच्या कार्यालयात दारूवाटपाचा कार्यक्रम केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची झाकलेली मूठ कधी तरी उघडी पडणारच होती, ती आता फेसाळत बाहेर पडली.यामध्ये महाराष्ट्राची लाज गेली याचे दुःख," असे म्हणत शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले.


राज्यात कोरोना सारखी भयंकर परिस्थिती उद्भवली असल्याने अनेक सामाजिक संघटना, विविध राजकिय पक्षातील कार्यकर्त्यांनी गरजुंना मदतीचा हात दिला आहे. असे असताना ठाण्यातील सत्ताधारी शिवसेनेच्या एका नगरसेवकाने चक्क मद्य वाटप केल्याने सर्वत्र शिवसेनेवर टीका होत आहे. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघातील वागळे परिसरातील या नगरसेवकाने शिवसेना आमदार रवींद्र फाटक यांच्या कार्यालयात हा दारू वाटपाचा कार्यक्रम केला. याच परिसरात राहणारे समाजसेवक प्रकाश सुर्वे यांनी याबाबत थेट ठाणे मनपा आयुक्त, ठाणे पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रार केली असून या नगरसेवकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121