नवी दिल्ली : टूलकिट प्रकरणात ट्विटर इंडियाला दिल्ली पोलीसांनी एक नोटीस दिली आहे. त्यांनंतर सोशल मीडिया कंपनीचे अमेरिकेतील मुख्यालय आता अॅक्शन मोडमध्ये आले आहे. दिल्ली पोलीसांचे ऑफिसर्स सोमवारी ट्विटरच्या कार्यालयात पोहोचले. त्यानंतर ट्विटरने ग्लोबल डेप्युटी जनरल काऊन्सिल आणि लीगल वीपी जीम बेकर यांच्याकडे हे प्रकरण सोपवण्यात आले आहे. बेकर हे अमेरिकन संस्था एफबीआयमध्येही कार्यरत होते.
'टाईम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, ट्विटर टुलकिट प्रकरणात अमेरिकन सरकारकडे जाऊ शकते. कोरोनामुळे लादण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे ट्विटर इंडियाचे मुख्यालय बंद आहे. अमेरिकन मुख्यालयाने या प्रकरणात आता लक्ष घातले आहे आणि भारतातील कार्यालयाच्या सतत संपर्कात आहेत.
नोटीशीनंतर कार्यालयात तणाव
भाजप नेत्यांनी केलेल्या पोस्टवर 'मॅन्युप्युलेटेड मीडिया', असा टॅग लावल्यानंतरच ट्विटर केंद्र सरकारच्या निशाण्यावर आले. दिल्ली पोलीसांनी टूलकिट प्रकरणी दिल्ली आणि गुडगाव येथील कार्यालयांवर छापा टाकला. पोलीसांनी नोटीस बजावल्यानंतर ट्विटर कार्यालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीसांनी केलेल्या कारवाईची माहिती तत्काळ अमेरिकेतील मुख्यालयात देण्यात आली. मात्र, अमेरिकेत तोपर्यंत दिवस उजाडला नव्हता.
दिल्ली पोलीसांनी ट्विटरकडे मागितला जबाब
दिल्ली पोलीसांच्या विशेष पथकाने टिलकिट आणि मॅन्युप्युलेटेड मीडिया प्रकरणात तपास करत आहे. या प्रकरणी दाखल झालेल्या तक्रारीनुसार चौकशी केली जात आहे. त्याबद्दल ट्विटरकडून स्पष्टीकरण हवे आहे. ट्विटरकडे अशी माहिती आहे, जी पोलीसांना माहिती नाही.
आत्तापर्यंत टूलकिट प्रकरणात काय घडलं ?
१८ मे : भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी एक स्क्रीनशॉट शेअर केला. त्यात काँग्रेसचे हे टुलकिट म्हटले होते. याच टूलकिटद्वारे भारताची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी म्हटले. काँग्रेसने त्वरित या गोष्टीचा विरोध केला. कथित टूलकिट खोटे असल्याचे त्यांनी म्हटले. संबंधित स्क्रीनशॉटमध्ये वापरण्यात आलेली कागदपत्रे खोटी आहेत, असेही सांगण्यात आले.
२० मे : ट्विटरने पात्रा यांच्या ट्विटला मॅन्युपुलेटेड मीडियाचे टॅग लावले. याशिवाय लेखिका शेफाली वैद्य यांच्याही ट्विटला असाच टॅग लावण्यात आला होता.
२१ मे : भाजपचे विनय सहस्त्रबुद्धे, प्रीति गांधी, सुनील देवधर, चारु प्रज्ञा, कुलजीत सिंह चहल या सर्वांच्या पोस्टलाही असाच टॅग ट्विटरने लावला होता.
२२ मे : केंद्र सरकारने ट्विटरला इशारा दिला होता. हे टॅग हटवण्यात यावेत, याबद्दल इशारा दिला होता. टूलकिट प्रकरणाची चौकशी सुरू आहे, अशाप्रकारे ट्विटरने असा निर्णय घेणे चूकीचे आहे.
२४ मे : दिल्ली पोलीसांनी ट्विटर, इंडियाचे एमडी मनीष माहेश्वरी यांना नोटीस बजावली होती. त्यांच्याकडून टूलकिट प्रकरणातील कागदपत्रे घेऊन विशेष पथकाच्या कार्यालयात बोलावण्यात आले. २२ मे रोजीच त्यांना बोलावण्यात आले होते. मात्र पोलीसांकडे चौकशीसाठी जाण्यात त्यांनी नकार दिला होता. ते या प्रकरणात संबंधित योग्य व्यक्ती नाहीत, असे त्यांनी सांगितले.
२५ मे : ट्विटर इंडियाला नोटीस पाठवल्यानंतर सकाळीच अमेरिकेच्या मुख्यालयात ही नोटीस बजावण्यात आली. ट्विटरने आपल्या बड्या अधिकाऱ्यांकडे हे प्रकरण सोपवले आहे.