मुंबई : सलग दोन वर्षे सातत्याने मुंबई आणि रायगडच्या कोरोना रुग्णांचे आधारस्थान बनलेले मुंबई हाऊसिंग फेडरेशन अध्यक्ष नगरसेवक प्रकाश दरेकर यांची महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण संस्था फेडरेशन संचालक पदी बिनविरोध निवड करण्यात आली.
मुंबई हाऊसिंग फेडरेशनच्या सर्व संचालक आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्याप्रसंगी तज्ञ संचालक विशाल कडणे यांनी ईशान्य मुंबई गृहनिर्माण संस्था सभासदांच्यावतीने प्रकाश दरेकर यांचे अभिनंदन करण्यात आले. त्यावेळी युवा फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रशांत कदम, अजय बागल, व्यंकटेश सामंत व मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्यातील गृहनिर्माण संस्थांच्या विविध समस्या, कोव्हीड प्रोटोकॉल, स्वयं पुनर्विकास इत्यादी महत्वाच्या प्रश्नांना प्रामुख्याने न्याय देण्याचे कार्य मार्गी लावणार असल्याचे प्रकाश दरेकर यांनी सांगितले. महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशन संचालक पदी निवड झाल्याने आता संपूर्ण राज्यभर दौरे राबवणार असून सहकार क्षेत्राच्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेऊन अधिकाधिक समाज कार्य करण्यावर भर देणार असल्याचे प्रकाश दरेकर यांनी सांगितले.