रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा

    16-May-2021
Total Views | 139
Ratnagiri _1  H


रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळाच्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्हा पोलीस दलामार्फत किनारपट्टी भागातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. या काळात मच्छीमारांनी समुद्रात बोटी घेऊन जाऊ नये तसेच इतर नागरिकांनी समुद्रकिनारी जाऊ नये याबाबत विविध माध्यमातून आवाहन करण्यात आले होते.
 
 
 
 
 
 
तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी सकाळपासून बंदोबस्त व पेट्रोलिंग नेमण्यात आली होती. रविवारी दुपारनंतर रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार वादळी पाऊस सुरुवात झाली असून ताशी ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहत असल्यामुळे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये झाडे पडून नुकसान झाले आहे.
 
 
 
 
 
अनेक ठिकाणी मुख्य रस्त्यावर झाडे पडून वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. त्यावेळी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने स्वतःकडील उपलब्ध साहित्याचा वापर करून ग्रामस्थांच्या मदतीने सदर झाडे तात्काळ दूर करून रस्ता वाहतुकीस सुरळीत केला आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक मोहित कुमार गर्ग यांनी स्वतः मिरजोळे, नाचणे येथे जाऊन पडझड झालेल्या ठिकाणी भेटी देऊन परिस्थितीची पाहणी करून आढावा घेतला. व नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले.
 
 
 
 
 
 
१. पूर्णगड पोलिस ठाणे हद्दीत कोळंबे गावाचे रोडवर मोठे झाड पडलेले असताना मा. पोलीस अधीक्षक यांनी स्वतः पूर्णगड पोलीस स्टेशनच्या मदतीने झाड दूर करून रस्ता वाहतूक सुरळीत केला आहे.
 
 
२. देवरूख पंचायत समिती समोर भलेमोठे झाड कोसळले देवरूख पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगताप व त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ झाड दूर करून रस्ता वाहतूक सुरळीत केला आहे. तसेच देवरूख येथील मात्र मंदिर येथे झाड पडलेले होते सदर ठिकाणी देवळी पोलिसांनी तात्काळ जाऊन झाड दूर करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला आहे.
 
 
३. नाटे ते पावस जाणारे रोडवर झाड पडून वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता तात्काळ पूर्णगड पोलिसांनी दूर करून रस्ता वाहतुकीस खुला केला आहे.
 
 
४. दापोली पोलिसानी महसूल विभागाच्या वतीने चक्रीवादळाच्या अनुषंगाने किनारपट्टी भागातील केळशी ,हरणे, अडखळ गावातील लोकांना अन्य सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहेत.
 
 
 
५. संगमेश्वर तालुक्यातील कार भाटले या गावातील रस्त्यावर झाड पडून वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. तेथे संगमेश्वर पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार यांनी तात्काळ दखल घेऊन सदर झाड ग्रामस्थांच्या मदतीने कट करून रस्ता वाहतूक सुरळीत केला आहे.
 
 
६. नाटे पोलीस ठाण्याचे हद्दीतील किनारपट्टी भागातील गावातील लोकांना चक्रीवादळाचा धोका होऊ नये म्हणून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याकरिता नाटे पोलिसांनी मदत केली आहे.
 
 
७. रत्नागिरी शहरात जवळील भाटे गावचे रोडवर पडलेले झाड तात्काळ दूर करून रत्नागिरी शहर पोलिसांनी रस्ता वाहतूक सुरळीत केला आहे.
 
 
 
या चक्रीवादळामुळे कोणालाही आपत्कालीन मदत आवश्यक असल्यास नागरिकांनी तात्काळ जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष संपर्क क्रमांक-०२३५२ २२२२२२, ०२३५२ २७१२५७, तसेच नियंत्रण कक्ष व्हाट्सअँप क्रमांक ८८८८९०५०२२ या वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121