'शिवसेना भवनातून का केले जातात करीना कतरिनाला फोन'

    13-May-2021
Total Views | 855

Lockdown1 _1  H



मुंबई : ठाकरे सरकारकडून गाजावाजा केले जाणारे 'मुंबई मॉडेल' इतकेच यशस्वी असेल तर लॉकडाऊन ३१ मे पर्यंत का वाढवण्यात आला, असा सवाल भाजप आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केला. ठाकरे सरकार कोरोनाचे खरे आकडे लपवत आहे. त्यांना राज्यातील परिस्थिती गंभीर असल्याची जाणीव आहे. बेड्स आणि ऑक्सिजनचा अजूनही तुटवडा आहे. त्यामुळे ठाकरे सरकारमध्ये लॉकडाऊन हटवण्याची हिंमत नाही, अशी टीका भाजपा आमदार नितेश राणे यांनी केली आहे.
 
 
 
ठाकरे सरकार कोरोनाची खरी परिस्थिती लपवण्यासाठी आणि आपल्या प्रतिमा संवर्धनासाठी बॉलिवूड कलाकारांकडून ट्विट करवून घेते. त्यासाठी शिवसेना भवनावरून अनेक कलाकारांना फोन केले जातात, असा गंभीर आरोप नितेश राणे यांनी केला. नितेश राणे यांनी गुरुवारी मुंबईत माध्यमांशी बोलताना यासंदर्भात भाष्य केले.
 
 
'सरकारी तिजोरीत खडखडाट असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सोशल मीडिया अकाऊंटस सांभाळण्यासाठी सरकार कोट्यवधी रुपये खर्च करते. तसेच ठाकरे सरकारने आपल्या प्रतिमा संवर्धनासाठी रेन ड्रॉप या एजन्सीला काम दिले आहे. ही एजन्सी दिशा पटानी, करिना कपूर, कतरिना कैफ, फरहान खान यांच्यासारख्या अनेक कलाकारांच्या संपर्कात आहे. तुम्ही करिना कपूर किंवा कतरिना कैफ यांची अलीकडची ट्विटस बघा. या बॉलिवूड सेलिब्रिटींकडून पैसे देऊन ट्विट करवून घेतले जात आहे,' असे नितेश राणे यांनी म्हटले.
 
 
मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या खरोखरच कमी झाली असती तर अनलॉक झाले पाहिजे होते. दुकाने आणि इतर व्यवहार सुरु करायला परवानगी दिली पाहिजे होती. पावसाळ्याला आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. मग उरलेल्या १५ दिवसांत लोकांना पैसे कमवू द्यायचे होते. मात्र, मुळातच मुंबई मॉडेल फसवे असल्यामुळे ठाकरे सरकारने लॉकडाऊन वाढवल्याचे नितेश राणे यांनी म्हटले.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121