मुंबई : राज्यातील सर्व संगणकपरिचालकांना महाराष्ट्र आय टी महामंडळाकडून कर्मचारी दर्जा देऊन राज्याच्या अर्थसंकल्पातून किमान वेतनाची तरतूद करणे या प्रमुख मागणीसाठी मागील १२ दिवसापासून मुंबईत आंदोलन सुरु आहे.आज संगणकपरिचालक लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करण्यासाठी आझाद मैदानावर जात असताना गेटवरच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलीस व्हॅन मध्ये बसवले व आंदोलन करण्यापासून रोखण्यात आले.
लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करणे हा गुन्हा आहे का ? असा संतप्त सवाल संगणक परिचालक संघटनेचे राज्यअध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी केला आहे. राज्यातील हजारो संगणकपरिचालक संपूर्ण मुंबईत असून शासनाने आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न करू नये हे आंदोलन मागणी मान्य होईपर्यंत कुठल्याही परिस्थितीत मागे घेण्यात येणार नसल्याचा ठराव संघटनेने घेतलेला असल्याने मुंबईत कुठेही संगणकपरिचालक आंदोलन करतील.त्यामुळे शासनाने तातडीने मागणी मान्य करून न्याय द्यावा अन्यथा एकही संगणकपरिचालक मुंबई सोडणार नासल्याचे संघटनेचे मुंडे यांनी सांगितले.