नवी दिल्ली : रविवारी रात्रीपासून जम्मू-काश्मीर येथील शोंपियाँ आहे. अद्याप यामध्ये चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षारक्षकांना यश आले आहे. यावेळी एक जवान जखमी झाल्याची माहिती देण्यात येत आहे.
जम्मू-कश्मीरच्या शोंपियाँमधील मुनिहाल परिसरात सुरक्षरक्षकांनी शोधमोहीम सुरू केली होती. त्यावेळी ही चकमक सुरू झाली आहे. या चकमकीत ठार झालेल्या चार दहशतवाद्यांपैकी दोन जन 'लष्कर-ए-तोएबा' या संघटनेचे असल्याची माहिती देण्यात येत आहे. या चकमकीदरम्यान सुरक्षादलातील एक जवान जखमी झाला आहे. चकमकीच्या ठिकाणी आणखी एक दहशतवादी असल्याची माहिती मिळाली आहे. अद्यापही सुरक्षारक्षकांकडून कारवाई सुरू असून या पार्श्वभूमीवर शहरातील इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे.