'त्या' नर्सला फुटला होता घाम! : वाचा काय घडलं त्या ३० मिनिटांत

    01-Mar-2021
Total Views | 556

Narendra Modi_1 &nbs
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लस घेण्यासाठी सकाळी सात वाजता एम्समध्ये हजेरी लावली. लसीकरण करण्यासाठी पुड्डुचेरीच्या परिचिका निवेदा कर्तव्यावर होत्या. तिने मोदींना भारत बायोटेक कोरोना लस दिली. निवेदा यांच्यासह त्यांची केरळची सहकारी रोसम्मा अनिल उपस्थित होत्या. या दोघीही एम्समध्ये गेल्या काही वर्षांपासून काम करत आहेत.
 
 
 
 
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लसीकरणाबद्दल ऐनवेळी सांगण्यात आले होते. त्यामुळे जरा वातावरण गंभीर होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींना या तणावाची कल्पना होती. त्यामुळे त्यांचा तणाव कमी करण्यासाठी त्यांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांशी बोलण्यास सुरुवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांची नावे व विचारली. मूळ गाव अशा हलक्या फुलक्या गप्पा सुरू ठेवल्या.
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विचारले की, वेटरनरीमध्ये वापरली जाणारी सुई वापरणार आहात का, त्यावर परिचिकांनी हसून नाही, असे उत्तर दिले. त्यांना काही काळ समजलेच नाही की मोदींनी हा प्रश्न का विचारला. त्यावर मोदींनीच खुलासा केली. नेते जाड कातडीचे असतात, त्यामुळे त्यांच्यासाठी वेगळी सुई आहे का, असा मिश्कील प्रश्न त्यांनी विचारला. हे उत्तर ऐकताच गंभीर वातावरणात एकच हशा पिकला. त्यानंतर दोघींसह फोटोही काढला.
 
 
मोदींनी मानले आभार
 
 
नर्स रोसम्मा अनिल म्हणाल्या की, आज माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस होता. कारण मी मोदींना स्वतः समोर कोरोना लस घेताना पाहिले. त्यांनी दोन्ही हातांनी नमस्कार करत मला वणक्कम म्हटले. कोरोना लसीकरणानंतर ३० मिनिटे मोदींना निरिक्षणात ठेवले होते. अर्ध्या तासाने मोदी पुन्हा जाण्यासाठी निघाले तेव्हा त्या दोघींचा निरोप घेतला.
 
 
आसामी गमछा, केरळ-पुद्दुचेरीतील परिचिका
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गळ्यात आसामी गमछा घेतला होता. ते सकाळी या पेहराव्यातच रुग्णालयात दाखल झाले होते. त्यानंतर दोन्ही परिचिका केरळ आणि पुद्दुचेरीतील होत्या. या तिन्ही राज्यांमध्ये २७ मार्च ते ६ एप्रिलपर्यंत विधानसभा निवडणूका होणार आहेत.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121