मुंबई भाजपने विचारली शिवसेनेची भूमिका
मुंबई : केरळ काँग्रेसच्या युथ कार्यकर्त्यांनी माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याच्या कटआऊटवर काळे फासले. एखाद्या भारतरत्न गौरवान्वित दिग्गज खेळाडूचा अशाप्रकारे अवमान करणे हे कितपत योग्य आहे, असा सवाल करत मुंबई भाजपने या प्रकाराचा निषेध केला आहे. सचिनने रिहनाला उत्तर देताना आम्ही आमच्या देशातील अंतर्गत विषय स्वतः सोडवू, असे विधान केले होते. त्यासोबत सर्व क्रिकेटपटूंनी सचिनच्या वक्तव्याला पाठींबा दर्शवत 'इंडिया टुगेदर' ही मोहिम सुरू केली होती.'
देशात लोकशाही आहे आणि प्रत्येकाला आंदोलन करण्याचे अधिकार आहेत. मात्र एखाद्याच्या भूमिकेमुळे त्याला खलनायक ठरवून त्याला काळे फासने कितपत योग्य आहे, असा देखील प्रश्न आता विचारला जात आहे. भारताच्या व मराठी अस्मितेचा मानबिंदू असलेल्या भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या पोस्टरला काळे फासणाऱ्यांबरोबर शिवसेना राज्यात सत्तेत आहे. ढोंगी हिंदुत्व होतेच, आता ढोंगी मराठी अस्मिता पण सिद्ध झाली आहे.", असा टोला भाजप मुंबईतर्फे शिवसेनेला लगावण्यात आला आहे.