OTT वर नियमावली : हिंदूद्वेष्ट्यांना बसणार चाप

    25-Feb-2021
Total Views | 188

tandav _1  H x


सोशल मिडीया, ओटीटी फ्लॅटफॉर्मसाठी नियमावली जाहिर


 
नवी दिल्ली : केंद्र सरकारने OTT मंच आणि डिजिटल मीडियासाठी नियमावली जाहीर केली आहे. सततचा हिंदूविरोध, हिंदू देवीदेवतांचा अवमान, धर्मविरोधा आडून प्रपोगंडा चालवणे यांसारख्या गोष्टींमुळे माजलेल्या स्वैराचाराला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. तांडव, सेक्रेड गेम्स, लैला, आश्रम या सारख्या वेबसिरीजवरून सुरू असलेला हिंदूंच्या बदनामीचे प्रकार आता यापुढे चालणार नसल्याचे संकेत केंद्र सरकारने दिले आहेत.
 


सोशल मिडीया, ओटीटी फ्लॅटफॉर्म, डिजीटल मिडीया यांच्यासाठी केंद्र सरकारने नियमावली बुधवारी जाहिर केली. सोशल मिडीया कंपन्यांनी दुटट्पी धोरणा टाळावे आणि डिजीटल माध्यमांनी अफवा, खोटी माहिती पसरवू नये, असे केंद्र सरकारने स्पष्ट शब्दात सांगितले आहे.
 
 
केंद्र सरकारने समाजमाध्यमे, ओटीटी फ्लॅटफॉर्म आणि डिजीटल माध्यमे यांच्यासाठी केंद्र सरकारने माहिती व तंत्रज्ञान कायद्यांतर्गत नवी नियमावली जाहिर केली. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, माहिती व तंत्रज्ञान आणि कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी त्याची पत्रकारपरिषदेत सविस्तर माहिती दिली. यामुळे सोशल मिडीया आणि ओटीटी फ्लॅटफॉर्मच्या होणाऱ्या गैरवापरावर आळा बसणार असल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले आहे.
 
 
 
सोशल मिडीयासाठी अशी आहे नियमावली
 
 
· सोशल मिडिया इंटरमीडीयरी आणि सिग्निफिकंड सोशल मिडीया इंटरमिडीयरी असे दोन प्रकार करण्यात आले आहेत. या सर्व प्रकारातील सोशल मिडीया प्लॅटफॉर्म्सना तक्रा निवारण व्यवस्था तयार करणे, २४ तासात तक्रार दाखल करून घेणे आणि तक्रारीचे निवारण १५ दिवसात करणे आवश्यक असेल.
 

· महिलाविरोधी कृत्याची तक्रार असेल तर संबंधित मजकूर २४ तासात हटवावा लागेल.

 
· सिग्निफिकंड सोशल मिडीयाला मुख्य तक्रार अधिकारी नेमावा लागेल, जो भारताचा रहिवासी असेल.
 

· कायदे यंत्रणांसोहत २४ तास संपर्कात राहणाऱ्या नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करावी लागेल.
 

· तक्रारीसंदर्भातील कारवाईचा मासिक अहवाल सादर करावा लागेल.
 

· एखादा विशिष्ट वाद समाजमाध्यमांवर कोणी सुरू केला, याविषयी कंपन्यांना माहिती द्यावी लागेल.
 

· सोशल मिडीया कंपन्यांचा भारतातील पत्ता आवश्यक असेल.
 

· प्रत्येक सोशल मिडीया प्लॅटफॉर्मकडे वापरकर्त्यांचे सत्यापन (व्हेरीफिकेशन) करण्याची यंत्रणा असावी. त्यासाठी मोबाईल क्रमांक अथवा आधार कार्डचा वापर ते करू शकतात.
 

· सोशल मिडीयासाठी सदर नियमावली आजपासून लागू झाली असून सिग्निफिकंड सोशल मिडीयासाठी ३ महिन्यांचा अवधी देण्यात आला आहे.
 
 
 
ओटीटी प्लॅटफॉर्म आणि डिजिटल मिडीयासाठी नियमावली
 
 
 
ओटीटी प्लॅटफॉर्म आणि डिजीटल मिडीयासाठी त्रिस्तरीय नियमावली जाहिर करण्यात आली आहे.
 
 
· आपल्या प्लॅटफॉर्म आणि डिजीटल मिडिया यांची मालकी, प्रकाशन याविषयी सविस्तर माहिती द्यावी लागेल. मात्र, त्यांची नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आलेले नाही. दोघांना तक्रार निवारण व्यवस्था निर्माण करावी लागेल.
 

· दोघांना सेल्फ रेग्युलेशन व्यवस्था तयार करावी लागेल, त्याच्या अध्यक्षपदी सर्वोच्च अथवा उच्च न्यायालयातील निवृत्त न्यायमूर्ती अथवा संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तीची नेमणूक करावी लागेल. कोणत्याही प्रकारची चूक अथवा तक्रार आल्यास त्याची सुनावणी, कारवाई आणि दंड करावा लागेल.
 

· दोघांसाठी माहिती व प्रसारण मंत्रालयातर्फे देखरेख यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. दोन्ही प्लॅटफॉर्म्सतर्फे तयार करण्यात आलेली स्वनियमनाची सनद या यंत्रणेतर्फे प्रकाशित केली जाईल, त्यात आचारसंहितेचाही समावेश असेल. त्याचप्रमाणे तक्रारींच्या निवारणासाठी आंतर विभागीय समितीदेखील स्थापन केली जाणार आहे.
 

ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी आणखी एक महत्वाचा नियम करण्यात आला आहे. सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी सेंसॉर बोर्डासारखी कोणतीही यंत्रणा नाही, मात्र त्यांनी त्यासाठी स्वनियमन करावे, असे सांगण्यात आले आहे. वय वर्षे १३ व त्यापुढील वयोगट, १६ व त्यापुढील वयोगट आणि प्रौढांसाठी अशी विभागणी ओटीटी प्लॅटफॉर्मने स्वत:हून तयार करावी, असेही नियमावलीत नमूद करण्यात आले आहे.
 
 
 
 
 
 
सोशल मिडीया कंपन्यांनी दुटप्पी धोरण टाळावे – रविशंकर प्रसाद
 
सोशल मिडियाचा होणारा गैरवापर, महिलांविषयी केली जाणारी चुकीची कृत्ये, फेकन्यूज याविषयी संसदेतही वेळोवेळी चर्चा झाली आहे. त्यामुळे सोशल मिडियाचा गैरवापर होऊ नये आणि जबाबदारी निश्चित व्हावी, यासाठी केंद्र सरकारने ही नियमावली जारी केली आहे. केंद्र सरकारला टिका आणि मतभेद मान्य आहेत, मात्र सोशल मिडीयानेही जबाबदारी पाळली पाहिजे. त्याचप्रमाणे सोशल मिडियाने अमेरिकेतील कॅपिटल हिलवर झालेला हल्ला आणि त्याविरोधात झालेली पोलिस कारवाई याचे समर्थन केले होते. मात्र, भारतात ज्या लाल किल्ल्यावरून देशाचे पंतप्रधान स्वातंत्र्यदिनी देशाला संबोधित करतात, जे राष्ट्रीय प्रतिक आहे, त्यावर झालेल्या हल्ल्याविरोधात पोलिस कारवाई केली असता त्याविरोधात भूमिका घेतली होती. त्यामुळे सोशल मिडीया कंपन्यांनी भारतात व्यवसाय करावा, महसूल मिळवावा, रोजगारही निर्माण करावा मात्र त्यांनी दुटप्पी धोरणा टाळलेच पाहिजे, असे रविशंकर प्रसाद यांनी स्पष्ट केले.
 
 
डिजीटल माध्यमांना अफवा पसरविण्याचा अधिकार नाही – प्रकाश जावडेकर
 
भारतात काही काळापासून ओटीटी प्लॅटफॉर्म आणि डिजीटल माध्यमे रुजली असून ती लोकप्रियही होत आहेत. त्यामुळे ही अतिशय चांगली बाब आहे. मात्र, मुद्रीत माध्यमांना प्रेस कॉन्सिलचे आणि दूरचित्रवाणी वृत्त वाहिन्यांनाही काही नियमावली पाळावी लागते. तसे डिजीटल माध्यमांसाठी काहीही नाही, त्यामुळे देशात नेमके किती डिजीटल माध्यमे आहे, याचीही नेमकी आकडेवारी मिळू शकत नाही. त्यामुळे तेथेही नियमावली असणे आवश्यक आहे. त्यासाठी मी ओटीटी प्लॅटफॉर्म आणि डिजीटल माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत तीन वेळा चर्चा करून त्यांनाच नियमावली तयार करण्यास सांगितले होते. मात्र, दुर्देवाने तसे झाले नाही, त्यामुळे सरकारने ही नियमावली जारी केली आहे. त्याचप्रमाणे डिजीटल माध्यमांची जबाबदारी निश्चित होणेही गरजेचे असून त्यांना अफवा अथवा खोट्या गोष्टी पसरविण्याचा अधिकार नाहगी, असे प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केले.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121