कॅलिफोर्निया : इन्स्टाग्रामवर कुठल्याही प्रकारची शिविगाळ करणारा किंवा DM करताना अश्लील संदेश पाठवणाऱ्याला युझरवर कडक कारवाई केली जाणार आहे. इन्स्टाग्राम आता अशा युझर्सवर नजर ठेवून आहे. इंस्टाग्राम आपल्या नियमावलींमध्ये आमुलाग्र बदल करण्याच्या तयारीत आहे. एखाद्या युझरबद्दल 'रिपोर्ट' केल्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यासाठी लागणारे आवश्यक पुरावे दिल्यानंतर त्याचे 'अकाऊंट' कायमचे बंद करण्याचा निर्णय इन्स्टाग्राम करणार आहे.
सोशल मीडियावर नकारात्मकता पसरवणाऱ्यांवर सुद्धा ही कारवाई केली जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारने केलेल्या कडक नियमावलीमुळे सोशल मीडियावरील कंपन्या अलर्ट झाल्या आहेत. आक्षेपार्ह मजकूर, पोस्टचे निरिक्षण केले जात आहे. अशा युझर्सबद्दल मिळालेल्या अहवालानंतर ही कारवाई केली जाणार आहे.
'हेट स्पीच'वर कंट्रोल
Instagram सध्या अशा युझर्सना ब्लॉक करत आहे कि जे युझर्स अश्लील संदेश पाठवत आहेत. शिविगाळ केला जाणारा मजकूरावरही लक्ष ठेवले जात आहे. वारंवार नियमांचे उल्लंघन करण्यात आले तर अकाऊंट कायमचेच बंद केले जाईल. फेक अकाऊंटद्वारे भडकाऊ मेसेज पाठवणाऱ्या अकाऊंटवरही नजर आहे.
येणार नवे फिचर!
DM कोण करू शकतो यासाठीही आता पर्याय उपलब्ध होणार आहे. सेलिब्रिटी किंवा बिझनेस अकाऊंटमध्ये ज्या व्यक्तींना फॉलो करण्यात येईल अशाच व्यक्ती DM (मेसेज) पाठवू शकतील. त्यामुळे बिनकामाच्या येणाऱ्या मेसेजचा त्रास वाचणार आहे. कंपनीतर्फे सर्वांसाठी हा पर्याय खुला करून देण्यात येणार आहे.