कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रतील प्रभाग अधिकाऱ्यांची खांदेपालट करण्यात आली असून काही प्रभाग क्षेत्र अधिका:यांची अन्य प्रभागात बदली केली आहे. तर तिघा प्रभारी प्रभाग अधिका:यांची उचलबांगडी करण्यात आली आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या अक्षय गुडधे यांची क प्रभागातून ह प्रभागात प्रभाग क्षेत्र अधिकारी या पदावर बदली करण्यात आली आहे. तर पालिकेचे उपलेखापाल सुहास गुप्ते यांच्याकडे प्रभारी प्रभाग क्षेत्र अधिकारी म्हणून ह प्रभागाचा पदभार होता. तो काढून त्यांच्याकडे अ प्रभाग क्षेत्रच्या प्रभाग क्षेत्र अधिकारी पदी बदली केली आहे. पालिकेचे उपसचिव किशोर शेळके यांची डोंबिवली पूर्व विभागीय कार्यालयातील ६/फ प्रभागाच्या प्रभाग क्षेत्र अधिकारी पदी पदभार सोपावला आहे. तर या प्रभागाचे प्रभारी प्रभाग क्षेत्र अधिकारी पदी असलेले भारत पाटील यांची बदली करून त्यांना लेखा परीक्षण विभाग मुख्यालयात केली आहे. कल्याण पूर्वकडील ४/जे प्रभागाच्या प्रभारी प्रभाग क्षेत्र अधिकारी वसंत भोंगाडे यांची पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभाग मुख्यालयात बदली केली आहे. तर त्यांच्या जागी वरिष्ठ लिपीक असलेल्या हेमा मुंबरकर यांची प्रभारी प्रभाग क्षेत्र अधिकारी पदाचा कार्यभार सोपविला आहे. सुधीर मोकल यांची क प्रभाग समितीच्या प्रभाग क्षेत्र अधिकारी पदी बदली करण्यात आली आहे. उपसचिव किशोर शेळके व वरिष्ठ लिपीक हेमा मुंबरकर यांची प्रभारी प्रभाग अधिकारी पदी लॉटरी लागली आहे. तर तत्कालीन प्रभारी प्रभाग अधिकारी वसंत भोंगाडे व भारत पाटील यांची मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. तर अ प्रभाग क्षेत्र अधिकारी पदी असलेले राजेश सावंत अर्जित रजेवर असल्याने त्यांच्या बदली संदर्भात स्वतंत्र आदेशानंतर काढण्यात येईल , असे कडोंमपा आयुक्तांनी म्हटले आहे.