मुंबई : विलीनीकरणाच्या मागणीसाठी महिन्याभरापासून सुरू असलेलं आंदोलन आणि राज्य सरकारची भूमिका या वादात एसटी महामंडळाचे ४३९ कोटींहून अधिक नुकसान झाले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे राज्यातील एसटी गाड्यांची होणारी धाव व कर्मचारी कर्तव्यावर रुजू होण्याचे प्रमाण अद्यापही कमीच आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल कायम असून सर्व मदार खासगी वाहतुकीवरच आहे.
संपकऱ्यांचा सरकारवर विश्वास नाही!
मुंबईतील आझाद मैदानासह राज्याभर सुरू असलेल्या आंदोलनात कर्मचारी हे विलीनिकरणावरच ठाम आहेत. पगारवाढीनंतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावी, अशी मागणी परिवाहन मंत्री अनिल परब यांनी केली होती. मात्र, तरीही कर्मचारी संपावर ठाम आहेत. काही ठिकाणी एसटी सेवा सुरू असून अद्याप पूर्ववत सेवा सुरू झालेली नाही. एसटी महामंडळाच्या नुकसानीचा हा आकडा आणखीही वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.