कांदिवली आग प्रकरणी इमारत प्रशासनाला नोटीस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Nov-2021   
Total Views |
 
mumbai_fire_0_1 &nbs
 
 
 
मुंबई : शनिवार, दि. ६ नोव्हेंबर रोजी मुंबईतील कांदिवली पश्चिम भागातील एका उंच इमारतीला आग लागल्याची दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेनंतर सुरु झालेल्या आरोप प्रत्यारोपणानंतर मुंबई अग्निशमन दलाने नुकतीच महाराष्ट्र अग्निशमन कायद्याच्या कलम 3 अन्वये संबंधित असलेल्या १५ मजली हंसा हेरिटेजला नोटीस बजावली आहे. इमारत प्रशासन हे फायर ऑडिट अहवाल सादर करणे आणि आवश्यक ती अग्निशामक यंत्रणा राखण्यात अपयशी ठरल्याचे, या नोटिशीत म्हटले आहे.
 
 
मुंबई अग्निशमन दलाने केलेल्या दाव्यानुसार, आग लागली तेव्हा इमारतीची अग्निशामक यंत्रणा ज्यामध्ये फायर अलार्म, स्प्रिंकलर, पाण्याच्या नळीच्या ओळी, या सर्व बाबी पूर्णपणे निकामी होत्या, मात्र दुसरीकडे मे-जून २०२१ च्या सुमारास इमारतीत मॉक ड्रिल आयोजित करण्यात आले होते आणि अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित होती. असा दावा स्थानिक रहिवाशांनी दावा केला आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@