नवाब मलिकांना दुसरी नोटीस!: अडचणीत वाढ

नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ

    07-Nov-2021
Total Views | 484

Mohit K amboj_1 &nbs


मुंबई : आर्यन खान क्रूझ पार्टी प्रकरण समीर वानखेडेंवरुन आता थेट मोहित कम्बोज भारतीय विरुद्ध मंत्री नवाब मलिक असे बनत चालले आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच आहेत. मंत्री नवाब मलिक यांना मोहित भारतीय यांनी दुसरी कायदेशीर नोटीस बजावली आहे. जाहीर वक्तव्य करुन बदनामी केल्या प्रकरणी ही नोटीस बजाविण्यात आली आहे. मंत्री मलिक यांनी मोहित कम्बोज यांच्याबद्दल वक्तव्य करत असताना 'अपहरणकर्ता', 'खंडणीखोर', 'कट रचणारा' या शब्दांचा वापर केला होता. बदनामीच्या गुन्ह्या अंतर्गत मलिकांना ही नोटीस बजावण्यात आली आहे.
 
 
 
 
 
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर मोहित भारतीय यांनी आरोपांच्या जोरदार फैरी झाडण्यास सुरुवात केली आहे. रविवारी त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन मलिकांवर जोरदार हल्लाबोल केला. मात्र, त्यापूर्वी अनिल देशमुखांचा एक फोटो ट्विट करत "राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख दाऊदच्या माणसासोबत काय करत आहेत?, असा प्रश्न विचारला. दाऊदचा माणूस चिंटू पठाण तिथे काय करतोय आणि अनिल देशमुख हे कोणाला नमस्कार करत आहेत. याचे उत्तर मलिकांनी द्यावे," असा सवाल त्यांनी विचारला आहे.
 
 
 
अंधेरीतील हॉटेल द ललितच्या शबाब, शराब आणि कबाबच्या मुद्द्यावर महाराष्ट्राचे राजकारण घुटमळत आहे. राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांवर मोहित कम्बोज-भारतीय यांनी चांगलीच तोफ डागली आहे. मलिकांनी रविवारी सकाळी पत्रकार परिषद घेत वानखेडे आणि भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांवर अनेक आरोप केले. या सर्वांला उत्तरे देताना मोहिक भारतीय यांनी हॉटेल ललितमध्ये शबाब, शराब आणि कबाब आणि नवाबही होता, असा दावा त्यांनी केला. त्यामुळे हॉटेलमध्ये नेमके काय घडले याबद्दल त्यांनी माहिती दिली.
 
 
मलिकांनी रविवारी पत्रकार परिषद घेत आर्यन खान प्रकरणावर नवे आरोप केले आहेत. द ललित हॉटेलचाही त्यांनी उल्लेख केला. ललित हॉटेल सात महिने बुक होती. तिथूनच प्रायव्हेट आर्मी तिथून काम करत होती. विलास भानुशाली, धवल भानुशाली, सॅम डिसूजा अनेक लोक येत होते. तिथे मुलीही येत होत्या. तिथे ड्रग्जही घेतलं जात होतं. ललितमध्ये शबाब आणि कबाब सुरू होते. फक्त नवाब नव्हता. हे सर्व तुमचेच लोक होते. वानखेडेच्या प्रवक्त्यानेच ती माहिती दिली, असेही ते म्हणाले.
 
 
कम्बोज यांनी घेतले फैलावर!
 
 
मलिक यांच्या पत्रकार परिषदेनंतर मोहित कंबोज यांनी पत्रकार परिषद घेऊन चांगलाच पलटवार केला. अंधेरीतील ललित हॉटेलमध्ये शबाब, शराब, कबाब होतेच पण नवाबही होते. तुमचे सरकार आहे ना मग लगेच ललित हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज चेक करा. त्यात सर्व काही उघड होईल, असेही ते म्हणाले. गेल्या पाच वर्षात मी एकदाही तिथे गेलेलो नाही, जाऊन तपासा. मी पुराव्यांच्या आधारे बोलत आहे. मलिकांवर आरोप करताना हवेत काहीही बोललेलो नाही, असेही कम्बोज म्हणाले.
 
 
भंगाराच्या व्यावसायातून कोट्यवधी कसे कमावतात?
 
 
मंत्री नवाब मलिक यांची मुले एकूण ४७ लाखांची मिळकत दाखवून मोठमोठ्या प्रॉपर्ट्या खरेदी करत आहेत. कुठल्या भंगाराच्या व्यावसायातून कोट्यवधी रुपये मिळवले कसे?, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. मात्र, मलिक हा मुद्दा सोडून इतर सर्व प्रकरणांबद्दल आपल्या पत्रकार परिषदेत बोलत असल्याचे मोहित कम्बोज म्हणाले. माझा आवाज दाबून टाकतील, असे त्यांना वाटत असेल, तर तसे करणे शक्य नाही. मी त्यांना घाबरणारा नाही. तुम्ही कोणतीही चौकशी करा, कोणतीही केस करा. मी घाबरणार नाही, असे खुले आव्हान त्यांनी मलिकांना केले आहे.





अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121