केडीएमसी पालिका निवडणुकांच्या तोंडावर विकासकामांची लगबग

केडीएमसी पालिका निवडणुकांच्या तोंडावर विकासकामांची लगबग

    13-Nov-2021
Total Views | 92
 
 
 bjp photo_1  H  
 
 
डोंबिवली (जान्हवी मोर्ये) : राज्य सरकारकडून मंजूर निधीतून कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रांत १५ कोटींची विकासकामे सुरू करण्यात येणार आहे. या विकासकामांमध्ये सर्व पक्षीय नगरसेवकांच्या प्रभागांचा समावेश आहे. त्यामुळे निवडणूकीच्या तोंडावर शिवसेनेने सर्वच पक्षांच्या नगरसेवकांना आणि मतदारांना खूष करण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेनेने खेळलेली ही खेळी आता यशस्वी ठरणार का हे येत्या निवडणूकीतूनच समजणार आहे.
 
डोंबिवली पूर्व-पश्चिमेसह कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रत १५ कोटींची विविध विकासकामे सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी राज्य सरकारतर्फे निधी मंजूर करून आणण्यात आला. या विकासकामांचे भूमीपूजन बुधवार, दि. ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पार पडले. या निधीतून प्रत्येक नगरसेवक प्रभागात जे गरजेचे रस्ते आहेत ते केले जाणार आहेत. राज्य सरकारतर्फे यापूर्वी मंजूर झालेल्या ३६० कोटींच्या रस्ते कामांचे प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंटची (पीएमसी) नेमणूक झाली आहे. त्यांच्याकडून डीपीआर बनवून टेंडर फ्लोट होईल. आणि ३६० कोटींच्या रस्त्यांची कामे २१ डिसेंबर किंवा डिसेंबर अखेर्पयत सुरू होतील, अशी माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे.
 
विकासकामे भूमीपूजन कार्यक्रमांतर्गत प्रभाग क्रमांक ११३ मधील मानपाडा रोड ते लहू म्हात्रे घरार्पयत रस्ता सी.सी. करणो, प्रभाग क्रमांक ११५ मधील नांदिवली पंचानंद येथील गजानन चौक ते गावदेवी मंदिर्पयत रस्ता बनविणे, नांदिवली पंचानंदातील नांदिवली नाला ते लाइफ केयर रुग्णालयार्पयत नाला बांधणो, मंगलदीप सोसायटी ते आशापुरा आर्केड दरम्यान कॉक्रीटीकरण करणे, एकतानगरच्या दिग्विजय सोसायटीलगत असलेल्या रस्त्यांचे व गटार पायवाट बनविणे, तुकाराम नगर मधील स्मृती सागर सोसायटी ते नीलकंठ निकेतन सोसायटी व तुकाराम परिसरात यु.टी.डब्ल्यू.टी. पध्दतीने रस्ता सी.सी. करणो, आयरेगाव ज्योतीनगर परिसरातील रस्ता सी.सी. करणे, गौरीशंकर वाडी परिसरातील गटार व पायवाटा तयार करणे, बाबूशेठ म्हात्रे मार्ग, शंकर मंदिर ते अण्णाभाऊ साठे चौकर्पयत रस्ता सी. सी. करणे, अंबिकानगर या प्रभागातील रामेश्वर सोसायटी ते राममंदिर र्पयत डीपी रस्ता तयार करणे आदी कामांसह अन्य कामांची सुरुवात निवडणुकांच्या तोंडावर सुरू करण्यात येणार आहेत.
 
तसेच, सागाव-सोनारपाडाच्या आईबाबांची सावली ते सागर्ली चौक येथे सी.सी. रस्ता तयार करणे, आजदेपाडा कमान ते माऊली बंगला (आयप्पा मंदिर रोड) र्पयत सी.सी. रस्ता तयार करणे, निवासी विभागातील मॉडेल महाविद्यालयमधील ६०० मीटर रस्ता कॉक्रीटीकरण, संतवाडी नीरानगर येथे शिवमंदिर ते अविनाश निवासर्पयत युटीडब्ल्यूटी पध्दतीचा रस्ता तयार करणे इत्यादी कामे केली जाणार आहेत. ही विकासकामे शिवसेनेसह, भाजपा आणि मनसे अशा सर्वच पक्षातील नगरसेवकांच्या प्रभागातील आहेत. विकासकामेच भूमीपूजन झाले आहे खरं पण प्रत्यक्ष कामाला कधी सुरूवात होईल माहीत नाही, अशी प्रतिक्रीया जनसामान्यातून व्यक्त केली जात आहे.
बऱ्याचदा विकासकामेच भूमीपूजन होते मात्र प्रत्यक्ष कामाला सुरूवातच होत नाही. या ठिकाणी असे घडणार नाही असे आश्वासन शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नागरिकांना दिले आहे. राज्यसरकारतर्फे मंजूर करण्यात आलेल्या निधीतून सर्वच पक्षांच्या नगरसेवकांच्या प्रभागात विकासकाम करण्यात येणार आहे. महापालिका क्षेत्रचा विकास हा एकमेव उद्देश समोर ठेवला आहे. ज्या प्रभागात गरज आहे त्या ठिकाणी निधी दिला आहे. विरोधीपक्षांच्या नगरसेवकांनी निधीची मागणी केली त्यांना ही निधी दिला आहे. कल्याण डोंबिवली विशेषत: ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांत पाणी प्रश्न गंभीर बनला होता. तसेच एमआयडीसीला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन वारंवार फुटण्याचे प्रकार घडत होते. हा प्रश्न ही लवकरच सोडविण्यात येणार आहे. कल्याण डोंबिवलीत प्रथमच कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रचा विकास हे उद्दिष्ट डोळ्य़ांसमोर ठेवण्यात आले आहे असे बोललले जात आहे. त्यामुळे कडोंमपा क्षेत्रचा विकास की निवडणूकीसाठीच एक नवीन खेळी शिवसेना खेळली आहे ते येत्या काळात समजेल.
ग्रामीण भागातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी मंजूर करून घेतलेल्या अमृतयोजनेचे काम बऱ्याच ठिकाणी सुरू आहे. पाण्याच्या टाक्यासाठी काही ठिकाणी जागा शोधण्याचे काम सुरू आहे. काही ठिकाणी टाक्यासाठी जागा मिळाली आहे. शासनाच्या जागा हस्तांरित करण्यासाठी येत्या एक-दोन दिवसांत कडोंमपा अधिकारी, कलेक्टर आणि प्रांत यांच्यासोबत बैठक होणार असून हे सर्व प्रश्न मार्गी लागतील. तसेच कल्याण शीळ रोडवरील एमआयडीसीची पाईपलाईन चाळीस वर्ष जुनी आहे. त्यामुळे ती वारंवार फुटत असते. या संदर्भात एमआयडीसी अधिका:यासोबत बैठका सुरू आहेत. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मनुष्यबळ वाढवून आणि कमी शटडाऊन घेऊन लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले असल्याचे या विकासकामे भूमीपूजन कार्यक्रमाप्रसंगी देण्यात आली.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
तृतीयपंथी नागरिकांना ओळखपत्र देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर

तृतीयपंथी नागरिकांना ओळखपत्र देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर

तृतीयपंथी नागरिकांना ओळखपत्र देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर आहे. तृतीयंपथीयांच्या हक्कांचे संरक्षण अधिनियम २०१९ मधील नियम २०२० अंतर्गत विभाग सहा आणि सात नुसार जिल्हास्तरीय समितीद्वारे तृतीयपंथीयांना त्यांचे ओळख प्रमाणपत्र, ओळखपत्र देण्यात येत आहे. तृतीयपंथी नागरिकांना ‘नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन’ या केंद्र शासनाच्या पोर्टलद्वारे तृतीयपंथी असल्याचे प्रमाणपत्र आणि ओळखपत्र उपलब्ध करून देण्याची योजना आहे. त्या अंतर्गत. आतापर्यंत राज्यातून ४,४११ ओळखपत्रे दिली आहेत. महाराष्ट्रानंतर दुसरा ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121