नवी दिल्ली : भारताच्या स्वदेशी लस कोवॅक्सिन घेतलेल्यांना ऑस्ट्रेलियामध्ये प्रवासाची मान्यता मिळाली आहे. म्हणजेच, आता लस घेतलेल्या कोणत्याही भारतीयाला लसीकरण प्रमाणपत्रासह ऑस्ट्रेलियाला जाता येणार आहे. त्याला १४ दिवस क्वारंटाईन करावे लागणार नाही.ऑस्ट्रेलियन सरकारने कोवॅक्सिनवर 'WHO' च्या बैठकीच्या दोन दिवस आधी हा निर्णय घेतला. जागतिक आरोग्य संघटनेची 3 नोव्हेंबर रोजी बैठक होणार आहे. कोवॅक्सीन बनवणाऱ्या भारत बायोटेक कंपनीला आशा आहे की या बैठकीत
डब्ल्यूएचओत्यांच्या लसीला आपत्कालीन मान्यता देईल.हैदराबादस्थित भारत बायोटेक कंपनीने लसीच्या मंजुरीसाठी १९ एप्रिल रोजी
डब्ल्यूएचओ कडे अर्ज केला होता. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही कोवॅक्सिनचे २ डोस मिळाले आहेत.
चीनच्या लसीलाही मान्यताऑस्ट्रेलियाने भारतीय कोवॅक्सीन तसेच चीनी कंपनी सिनोफॉर्मच्या 'BBIBP-CorV' लसीला मान्यता दिली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये आता भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या २-२ लसींना मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये भारताचे कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन आणि चीनचे सिनोव्हॅक आणि सिनोफॉर्म यांचा समावेश आहे.
डब्ल्यूएचओच्या मान्यतेत पेंच कुठे अडकला आहे?डब्ल्यूएचओने यापूर्वी २६ ऑक्टोबर रोजी कोवॅक्सिनच्या मंजुरीबाबत बैठक घेतली होती. यामध्ये भारत बायोटेककडून लसीबाबत अधिक माहिती मागविण्यात आली होती. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने कंपनीकडे या लसीचे धोके आणि फायद्यांशी संबंधित तांत्रिक डेटा मागितला होता.
२६ ऑक्टोबर रोजी WHO च्या बैठकीत काय झाले?
गेल्या WHO च्या बैठकीत कोवॅक्सिनच्या मान्यतेवर कोणताही निर्णय होऊ शकला नाही. तथापि, WHO च्या औषध आणि आरोग्य उत्पादनांच्या एडीजी मेरीएंजेला सिमाओ यांनी सांगितले की, भारताच्या लस उद्योगावर आमचा विश्वास आहे. भारत बायोटेक आम्हाला सतत डेटा देत आहे. आता ३ नोव्हेंबरला होणाऱ्या बैठकीत याबाबत निर्णय होऊ शकतो.