मुंबई : ‘राष्ट्रजागरण व्याख्यानमाले’चे तिसरे सत्र बुधवार, दि. २७ रोजी सायंकाळी ७.०० वाजता होणार असून यावेळी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. ’अवरोध’ या वेबसीरिजमध्ये गोखले यांनी पंतप्रधान मोदी यांची भूमिका साकारली. ही भूमिका साकारताना त्यांना आलेला अनुभव, मोदींच्या व्यक्तिमत्त्वाचा त्यांनी केलेला अभ्यास आदी मुद्द्यांवर विक्रम गोखले भाष्य करणार आहेत.