युवीला का केली पोलिसांनी अटक? वाचा सविस्तर...

युझवेंद्र चहलबाबत बोलताना लाईव्ह व्हिडियोमध्ये जातीवाचक उद्गार

    18-Oct-2021
Total Views | 159

yuvi_1  H x W:
नवी दिल्ली : सध्या भारतीय माजी क्रिकेटपटू युवराज सिंग हा चांगलाच चर्चेत आला आहे. त्याला रविवारी १७ ऑक्टोबरला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर लगेचच त्याची जामिनावर सुटकादेखील करण्यात आली. मात्र, यानंतर संपूर्ण क्रीडावर्तुळात चांगलीच चर्चा रंगली. २०१९मध्ये युवराज सिंगने रोहित शर्मासोबत लाईव्ह व्हिडियोमध्ये बोलताना युझवेंद्र चहलबाबत जातीवाचक शेरेबाजी केली होती. यावरून त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, घडला प्रकार आणि त्याची तीव्रता लक्ष घेता, युवीने त्या प्रकाराबद्दल जाहीर माफिदेखील मागितली होती.
नक्की प्रकरण काय?
भारतीय माजी क्रिकेटपटू युवराज सिंग आणि रोहित शर्मा यांच्यामध्ये इन्स्टाग्रामवर लाईव्ह व्हिडियोवर बोलणे चालू होते. यावेळी युवीने मस्करीत युझवेंद्र चहलवर जातीवाचक शेरेबाजी केली. त्याच्या या विधानावर सोशल मीडियावर प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात आली. या प्रकरणी मानवी हक्क संस्थेचे समन्वयक रजत कलसनने गेल्या वर्षी 2 जूनला गुन्हा दाखल केल्यानंतर अटकेची मागणी केली होती. युवराजवर आयपीसी (IPC)च्या कलम १५३, १५३ए, २९५, ५०५सह एससी/एसटी कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली.
युवराजने मागितली होती माफी
युवराजच्या या विधानावरून मोठा गदारोळ झाला होता. सोशल मीडियावर 'युवराज सिंग माफी माग' असा ट्रेंडही व्हायरल झाला होता. यानंतर त्याने आपली बाजू मांडली. ''माझा कोणत्याही प्रकारच्या असमानतेवर विश्वास नाही. धर्म, रंग, पंथ किंवा लिंग यावरून मी कधीच भेदभाव करत नाही. लोकांचे कल्याण करण्यासाठी मी झटत आलो आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचा मी आदर राखतो. मला जातीवाचक टीका टिप्पणी करण्यात काहीही रस नाही. रोहितशी झालेल्या त्या संवादादरम्यान माझ्या शब्दांचा उलट अर्थ काढण्यात आला. परंतु माझ्या या कृत्यामुळे चहलव्यतिरिक्त अन्य कोणाच्या भावना दुखावल्या असल्यास मी माफी मागतो'', अशा शब्दात युवराजने जाहीर माफी मागितली होती.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121