दहा टक्के कोटयातील घरे बिल्डरांच्या ताब्यात
भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा गौप्यस्फोट
गायकवाड यांनी घेतली आयुक्तांची भेट

कल्याण : महापालिका हद्दीतील दहा टक्के कोटय़ातील 1335 आरक्षित घरे बिल्डरांनी कडोंमपाला हस्तांतरीत केला नसल्याची धक्कादायक माहिती भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी दिली आहे. गायकवाड यांनी 1335 घरे महापालिकेने ताब्यात घेतली नसल्याची बाब माहिती अधिकारात माहिती मागवून घेतली होती. आमदारांचा हा गौप्यस्फोट पाहता महापालिका दहा टक्के कोटयातील घरे ताब्यात घेण्याबाबत किती उदासीन आहे ही बाब समोर आली आहे.
दहा टक्के कोटयातील 1335 आरक्षित घरे बिल्डरांनी कल्याण डोंबिवली महापालिकेस हस्तांतीरीत केली नाहीत. बिल्डरांनी यातील काही घरे विकली आहेत. तर काही घरे भाडयाने दिली आहेत. ही घरे महापालिकेने ताब्यात घेण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू करावी अशी मागणी गायकवाड यांनी कडोंमपाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेऊन केली आहे. आयुक्तांच्या भेटीनंतर त्यांनी ही माहिती दिली. या घरांच्या संदर्भात आयुक्तांनी हा विषय ठाणे जिल्हाधिकारी यांच्या अखत्यारीत येत आहे. त्यांच्याकडून ही कारवाई केली पाहिजे असे सांगितले आहे.
कल्याण स्टेशन पश्चिम परिसरातील स्मार्ट सिटी सुधारणा नुकताच प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ झालेला आहे. मात्र स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कल्याण पूव्रेतील विकास कामांना प्राधन्य दिलेले नाही. काही ठिकाणी स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या जागा ताब्यात आलेल्या नाहीत. महापालिका शून्य कचरा मोहिम राबवित असली तरी अनेक ठिकाणी कचरा वेळेवर उचलला जात नाही. घंटागाडीवर कामगारांना कोरोना काळात काम केले आहे. त्यांना पगार दिला जात नाही. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शंभर फूट रस्त्यावरील माधव अपार्टमेंटमधील रहिवाशांच्या पुनर्वसन करण्यात यावे. ही इमारत तोडल्यावर शंभर फूटी रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. रस्त्यावरील चेंबर्स ची झाकणो फुटली आहे. त्यांच्या दुरूस्ती कामाचे बिल कंत्रटदार लाटत आहे. या कामाकडे आयुक्तांनी लक्ष द्यावे अशी मागणी गायकवाड यांनी आयुक्तांशी चर्चा करताना केली आहे.
कल्याण पूव्रेतील चिंचपाडा,आशेळे, नांदीवली, माणोरे, वसार, डावलपाडा, द्वारली या भागात पाणी पुरवठा अनियमित व कमी दाबाने होत आहे. या भागातील रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. मलंग रोडवरील पथ दिवे बंद अवस्थेत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम कोणत्या कारणामुळे थांबले आहे . पुना लिंक रोडच्या सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचे काम अर्धवट सोडले आहे याची माहिती आमदार गायकवाड यांनी आयुक्तांकडे मागितली आहे.
या विविध प्रकरणात आयुक्तांनी भेट देऊन पाहणी करावी. हे विषय मार्गी लावण्यात यावे अशी मागणी आमदार गायकवाड यांनी केली आहे. आयुक्तांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली जाईल असे आश्वासन आमदारांना चर्चे नंतर दिले आहे.
चौकट- मनात डिस्टन्स न ठेवल्यास शहराचा विकास होईल- गणपत गायकवाडमनामध्ये डिस्टन्स ठेवले नाही तर शहराचा चांगला विकास ही होईल आणि चांगली कामे ही होतील असे आमदार गायकवाड यांनी सांगितले. भाजपच्या एका कार्यक्रमात जाऊन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मनामध्ये डिस्टन्स ठेवू नका असे माईक हातात घेऊन वक्तव्य केले होते. त्यांचा धागा धरीत गायकवाड यांनी मनामध्ये डिस्टन्स ठेवले नाही तर शहराचा चांगला विकास होईल असे सांगितले.
------------------------------------------------------------