काँग्रेस नेते आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना कोरोनाची लागण!

    18-Sep-2020
Total Views | 48

nitin raut_1  H


पत्नीलाही कोरोनाची लागण; ट्विट करत दिली माहिती


मुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. अनेक नेते आणि मंत्री कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. अशात आता काँग्रेस नेते आणि ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना कोरोनाची लागण झाली आहे. लक्षणे नसल्यामुळे ते तूर्तास घरी क्वारंटाइन झाले आहेत. राऊत यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. तसेच माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे. नितीन राऊत यांच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


“माझी कोव्हिड चाचणी आज पॉझिटिव्ह आली. गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती करु इच्छितो, की सावधगिरीचा उपाय म्हणून त्यांनी आपापली कोरोना चाचणी करुन घ्यावी. प्रत्येकाने सुरक्षित राहा आणि काळजी घ्या” असे आवाहन नितीन राऊत यांनी ट्विटरवरुन केले आहे.







कोरोना विषाणूने संपूर्ण देशात धुमाकूळ घातला आहे. राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत ठाकरे सरकारमधील अनेक नेत्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. यातील सर्वांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि राज्यमंत्री विश्वजीत कदम यांना कोरोना विषाणूचे सक्रमण झाले होते. परंतु, त्यांना कोरानाची लक्षणे नसल्याने घरातच होम क्वारंटाईन करण्यात आले होते. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.




अग्रलेख
जरुर वाचा
मनसेला झटका! अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई

मनसेला झटका! अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई

(Avinash Jadhav) मीरा-भाईंदर शहरात गेल्या काही दिवसांपासून मराठीवरुन वातावरण चांगलेच तापले आहे. अमराठी व्यापाऱ्यांनी केलेल्या शक्तीप्रदर्शनाला प्रत्युत्तर म्हणून मीरा-भाईंदर शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज (८ जुलै) मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र, पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारत प्रतिबंधात्मक कारवाईला सुरूवात केली आहे. सोमवारपासून पोलिसांनी मनसे आणि उबाठाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यास सुरुवात केली होती. मंगळवारी पहाटे पोलिसांनी आणखी कठोर पाऊल उचलत मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाप्रमुख अविनाश ..

मेट्रोला विलंब झाल्याने घाटकोपर स्थानकात तुफान गर्दी

मेट्रोला विलंब झाल्याने घाटकोपर स्थानकात तुफान गर्दी

मेट्रोचे डबे वाढविण्याची प्रवाशांची मागणी अतिरिक्त कोच खरेदीसाठी मेट्रो वनचा प्रस्ताव मुंबई मेट्रो मार्ग १ वर तांत्रिक बिघाडामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवार,दि.७ रोजी प्रवाशांची विशेषतः कार्यालयात जाणाऱ्या मुंबईकरांची प्रचंड तारांबळ उडाली. तांत्रिक बिघाडामुळे रेल्वेला उशीर झाल्याने बघता बघता घाटकोपर स्थानकासह इतर स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढली. मुंबई मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तांत्रिक बिघाडामुळे रेल्वेला उशीर झाल्याने गर्दी वाढली आहे. टार्गेट स्पीड गाठू न शकल्याने एक ट्रेन ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121